वाट क्षितिजाची

*वाट क्षितिजाची...*

राहुल




आकाशाला जमिनीशी भेटवणारी आभासी  रेघ.. क्षितिज

जेवढे जवळ जाऊ तेवढंच लांब जाणारं...क्षितिज


 उगवत्या मावळणाऱ्या सूर्याची आभा खुलवणारं..क्षितिज

जमिनीची तहान भागवायला येणाऱ्या काळ्या ढगांची रुपेरी किनार...क्षितिज


अथांग सागराला तेवढीच अथांग अथक साथ देणारं....क्षितिज

उंच उंच पर्वतरांगा, नभांशी भिडणारं उत्तुंग.... क्षितिज


आसुसलेल्या जमिनीला इंद्रधनूच्या कमानीनं आभाळाशी जोडणारं.....क्षितिज

 सप्तरंगात जणू फुलणाऱ्या प्रेमाची क्षणिक भूल देणारं...क्षितिज


जणू कुणी दोन स्वप्नाळू जीवांच्या मिलनाचं स्वप्नस्थान...क्षितिज

कुणा भाववेड्या भक्ताचं अंतिम ठिकाण असंच एखादं भव्यदिव्य...क्षितिज


प्रत्येकाचं आपलं कधी कवेत घ्यावंसं, तर कधी विस्तृत करावंसं वाटणारं...क्षितिज

भास असूनही लोभसवाण्या भेटीची आस दाखवणारं...क्षितिज


अशाच एका सुंदर क्षितिजाकडे घेऊन जाणारी ही सुंदर वाट..

प्रत्येकाला अशीच सुंदर वाट मिळावी...आणि मिळावं आपापलं ...क्षितिज


राहुल लाळे

०५-१०-२०२०

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका