पुलवामा

 पुलवामा

राहुल




सीमेवर रक्तफुले ते उधळती

अन इथे जनांना गुलाब रिझवती


त्यांनाही खुणावले असेल

त्यांच्या फुलामनांनी


असतील निघाले भेटीला

त्यांच्या  व्हॅलेंटाईनला तेही


नतद्रष्ट नराधमांनी घातला घाला

अन रक्ताची सांडवण केली


मर्दांचा या बदला घेतील

आपलेच इतर जवान बंधू


या जवानांच्या कुटुंबियांना

भरभक्कम पाठिंबा देऊ

अन्

शत्रूला धडा देण्या सर्व एकत्र येऊ

हीच त्यांना आज सुमनांजली 


राहुल लाळे



Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका