मनदीप

 उजेड थोडा ठेवू, 

अंधार फार होतो

पणती जपून ठेवू, 

अंधार फार होतो


सगळीकडेच आहे

 संशयाचे वादळ वारु

नाती जपून राहू

शंकेस दूर सारु


थंडीतल्या हवेने

जरी गोठतील श्वास

हृदये जागती ठेवू

देतील ती विश्वास


वास्तवाची येथे

पेटते होळी रोज 

स्वप्ने जपून ठेवणे

हाच यत्न आज

 

काळ्या नभांतूनच

 वीज पहा चमकते

बरसणाऱ्या पावसातून

भिती सर्व वाहून जाते


मनातल्या जखमातून

पणतीत तेल घालू

अंधार होता कधी मग

मनदीप लगेच लावू


🌈 राहुल

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका