पतंग
*पतंग....*
राहुल
मन वेडं.. अधीरतेनं कुठंतरी ओढलं जातं
मांजाबरोबर पतंग जसा आकाशात उडत रहातो...
भिडतो एक पतंग ,आकाशात दुसऱ्या एका पतंगांशी ....
खेळण्यामिळण्यासाठी नाही....तर एकमेकांना काटण्यासाठी
उडणाऱ्या पतंगांची त्या, चलाखी नाही माझ्याकडे
गळ्याने गळा कापायची शिताफी नाही हो माझ्याकडे
शब्द काही खरडण्यासाठी कोरा कागद मी आणला
भावनांचे दोर लावून आप्तांनी पतंग त्याचा उडवला
आयुष्यासारखा हा पतंग...कुठपर्यंत हा उडेल
सरेल रात्र, वाट सरेल...तसाच कधी हा ही कटेल
उंचीवर असेल तोवर ...वाह वाह होत राहील
कटल्यावर एकदा काही दिवस हळहळ ही होत राहील
भान विसरुन सारे चला उंच भराऱ्या घेऊया
एकमेकांचे धागे होऊन पतंग बनून चला उडूया...
राहुल लाळे
१४.०१.२०२१

Comments
Post a Comment