मातेची व्यथा...

 मातेची व्यथा...


नऊ मास उदरात माझ्या तुला वाढवले मी 

डोळ्यासमोर पेटती  चिता तुझी पाहिली मी 



ना गोड तुझे  हासू , ना पहिले रडणे पाहिले मी

गोठलेले आसू अन दबलेले हुंदके आता,  माझेच ऐकते मी


बोललेले नवस सारे लवकरच  फेडणार होते मी

अपार वेदनेचे आता गाऱ्हाणे कुणापुढे मांडू मी


भंडार्‍याच्या दुर्दैवी  बालकांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻🙏🏻 

आणि 

अभागी मातांचे कितीही केले तरी कमी पडणारे सांत्वन...

😞😞


...राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका