सांजवेळ
सांजवेळी
राहुल
सांजवेळ हळूच येई
क्षितिजाला रंगवून जाई
आकाशावर रक्तिमा येई
गालावरची जणू लाली
तापून थकलेला सूर्याजी
समुद्राकडे विसाव्याला जाई
सोनेरी किरणांनी त्याच्या
आसमंत भारावून जाई
चंद्रभेटीच्या आसेने
आकाशी रांगोळ्या सजती
सांजचांदण्या या नभात
सुंदर महिरप खास सजवती
सांजवेळीचा मंद वारा
उजाळा नवा आठवणींना
ओढ घराची लावे
मनुष्य प्राणी अन् पक्षांना
कातरवेळ ही सांज वेळ
आणतसे गडद अंधार
आहे परी ही भारी अवखळ
प्रेमीजनांना तिचाच आधार
सांज वेळी शुभंकरोती
कुठे कानी पडे आरती
देव्हारी मंद ज्योत तेवते
श्रांत जीवाला शांत करते
सांजवेळ.....
राहुल लाळे
१२-०१-२०२१

Comments
Post a Comment