ख्रिसमस

 🎄 ख्रिसमस ...भारतातला 🎄

राहुल



गोठा किंवा कोठडीत जन्म घेऊन देव तो माणसात येतो..

येशु असो वा कृष्ण , संस्कृती- माणुसकी-कर्तव्य  शिकवतो..

दीन-दुबळ्यांचा संगती, प्रेमाचा जणू झराच तो बनतो

  

नको सोनं नको वैभव, नको तो राजस थाट

करुणेच्या ओठीं फुलवू हास्य, हाच माणुसकीचा पाठ


एक सारथी बने शिष्याचा, पाय धुतो दुसरा भक्तांचा

जीवन ते जगले शिकवत पाठ नम्रता, समतेचा


माझे कर्म माझा धर्म , क्षमा - सेवा यांची धरावी वाट

दुर्जनांचा अंत व्हावा , अंतरीचा द्वेष वितळून ..यावी शांततेची पहाट


घंटा-मेणबत्त्या, शंख- पणत्या सारे 

काही एकच सांगतात..

मैत्र, प्रेम, सुखसमाधानाचा प्रकाश पसरवतात.


दिवाळी असो वा नाताळ, उत्सव असतो दिव्यांचा

मनातला अंधार दूर करा हा संदेश मिळण्याचा...


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका