रामनवमी
तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुंडरीक विशालाक्षौ चीर कृष्णा जिनाम्बरौ ।।
आज रामनवमी आहे.
प्रभूंच्या गोंदवल्यातल्या या मूर्ती पहाताना मन भारावून जातं
कलाकाराने आपली सगळी कल्पना शक्ती वापरून रामचंद्रांचे अति अति लोभस मूर्ती बनवली आहे.
हा जानकीवल्लभ जणू त्याला दर्शन देता झाला, आणि एक कलाकृती घडून गेली.
कलाकृती म्हणावे की अस्सल छायाचित्र म्हणावे ?
राम रक्षेत वर्णन केल्या प्रमाणे तो राजीव लोचन आहे. मुखावर विलक्षण आल्हाददायक , आश्वासक हास्य आहे.शांतमूर्ती लोकभीराम आहे. सुकुमार आहे. महाबली आहे. नानालंकारदीप्तम आहे.
ध्यायेदाजानूबाहु आहे.
धृतशरधनूषं आहे.
पाठीला भाता आहे.
शरीर बळकट आहे. डोळ्यात खट्याळपणा आहे.
गळ्यात हार आहे.
मनातली असणारी सारी रघुभक्ती उचंबळवुन टाकणारी.पहातच राहावा असा राजाराम.
🙏🏼 रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼

Comments
Post a Comment