वेड असावे.. व्यक्तता
व्यक्तता...वेड असावे
राहुल लाळे
वेड असावे गाण्याचे
वेड असावे ऐकण्याचे
वेड असावे पाहण्याचे
वेड असावे प्रतिसादाचे
काहींना....
नाही जमत लिहायला
नाही जमत गायला
नाही जमत चितारायला
नाही जमत व्यक्त व्हायला
काहींना.....
काहींनी लिहावे
काहींनी वाचावे
काहींनी गावे
काहींनी ऐकावे
चालू राहू द्यावे
आदानप्रदान...
कधी तरी
उलटे ही व्हावे...
गाणाऱ्याने ऐकावे
वाचणाऱ्याने लिहावे
चालू राहू द्यावे
आदानप्रदान...
मनातले व्यक्त करावे
इतरांचे जाणून घ्यावे....
सगळ्यांनी
© राहुल लाळे
Comments
Post a Comment