मन गुंतले एवढे
** *मनवाटा* **
राहुल
मन गुंतले एवढे, जरा उसंत नाही
देहास या माझ्या, विसावा म्हणून नाही
जीवनी या माझ्या, संधी अनेक येती
साधावयास त्यांना, वेळ अपुरा होई
प्रवासात या माझ्या, अनंत वाटा काटेरी
विश्वास, धैर्य अन् श्रध्दा, असती माझे सोबती
प्रत्येक येणाऱ्या क्षणांत, भरपूर मी जगतो
मिळणाऱ्या अनुभवांनी समृद्ध मी होतो
भेटतात रस्त्यात या, माणसे वाईट चांगली
मिसळून त्यांच्यात मला, साथ छान मिळाली
स्वार्थ मनात कुठलाच बाळगला कधीच ना मी
लाज वागण्याची, अन् मला वाटली नाही
जीवासवे जन्मे मृत्यू, सत्य जाणले मी
कुठल्याही संकटाला मग, सामोरा भिडलो मी
जखमा उरातल्या खोल, भरल्या माझ्याच त्या मी
इतरांच्या दुःखावरही हळूवार फुंकरतो मी
मनुष्य देह म्हणे हा, मिळतो महत्प्रयासाने
मिळालेले आयुष्य हे, मी जगेन आनंदाने
- राहुल लाळे
२ ऑक्टोबर २०२०.
Comments
Post a Comment