जे तुझ्याचसाठी

 *जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले*


☝🏻३:०८


*जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले*


पुण्याहून गोव्याला निघालो ड्राईव्ह करताना ब्लु टूथ वर गाणी ऐकत होतो , उषा मंगेशकरांचे *केळीचे सुकले बाग* ऐकत होतो तेव्हा बायको म्हणाली पाडगावकरांचे ते गाणे आहे का?


कुठले कुठले तिलाही आठवत नव्हते, आठवण्याचा प्रयत्न करूनही ओठावर येत नव्हते. वाटेत कोल्हापूरला थांबलो, महालक्षमीचे दर्शन घेऊन बाहेर येताच आठवले.


फारसे लागत नाही, ऐकले जात नाही पण तरीही प्रसिद्ध आहे ऐकणीय गुंग करणारे आहे, जरूर ऐका.. काव्य - गीत- आर्तता - विश्वनाथ मोऱ्यांचं संगीत- उषाताईंचा आवाज -सगळंच अवर्णनीय...


राहुल लाळे


जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले

वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले

रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला

जयघोष तुझा मग सर्व जगाने केला

मी दूर एकटी, माझे डोळे ओले

त्या फुलासारखी अबोल माझी प्रीत

ती अबोल पूजा या माझ्या हृदयात

नच ओठांवरती नाव तुझे कधि आले

तुज कसे कळावे ? देवा नाही कळले !

मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले

त्या फुलात माझे हृदय ठेवुनी गेले


गीत-मंगेश पाडगांवकर

संगीत-विश्व

नाथ मोरे

स्वर-उषा मंगेशकर


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका