कविता, चारोळ्या
दोन पक्षी
झाडावर बसलेले
निःशब्द ...
बराच वेळ
मनातलं सांगायला अनेकदा शब्द लागत नाहीत...
या हृदयीचे त्या हृदयी
राहुल 🌈
†******?**
😊👌🏻
जेव्हां जे करायचं होतं
तेव्हां ते आपण केलं...
जे तेव्हां राहून गेलं
आता ते नक्की करायचं
वय काय वाढत राहील..
दिवस ते जात राहतील
जे केलं ते आपलं म्हणायचं
राहिलं ते सोडून द्यायचं
🌈 राहुल
----------
जमिनीला तहान
नेहमीच या पावसाची
पावसाला ही आता
ओढ लागलीय जमिनीची
🌈राहुल
–---------
उजेड थोडा ठेवू,
अंधार फार होतो
पणती जपून ठेवू,
अंधार फार होतो
सगळीकडेच आहे
संशयाचे वादळ वारु
नाती जपून राहू
शंकेस दूर सारु
थंडीतल्या हवेने
जरी गोठतील श्वास
हृदये जागती ठेवू
देतील ती विश्वास
वास्तवाची येथे
पेटते होळी रोज
स्वप्ने जपून ठेवणे
हाच यत्न आज
काळ्या नभांतूनच
वीज पहा चमकते
बरसणाऱ्या पावसातून
भिती सर्व वाहून जाते
मनातल्या जखमातून
पणतीत तेल घालू
अंधार होता कधी मग
मनदीप लगेच लावू
🌈 राहुल
[1/5, 18:48] Rahul Lale: 👌🏻👌🏻
अंधार दाटूनी येता
मनदीप मी प्रज्वलतो
मळभ मग कुठले
लख्ख उजेड पडतो
🌈राहुल
[1/5, 18:53] Rahul Lale: अस्वस्थता मनाची
मी स्वस्थपणे पहातो
शंका मनातल्या अन्
निःशंकपणे निरसवतो
🌈राहुल
[1/5, 22:30] Rahul Lale: 👌🏻👌🏻
ज्योती किती धीराची
इवलासा तिचा जीव
पण
अंधारातून चालताना ती
प्रकाशाची ओढ दावी
🌈 राहुल
[1/5, 22:50] Rahul Lale: अंधाराचं असणं
ही पण एक मजा आहे
घनदाट तिमिरातूनच तर
प्रकाशाकडे जाणारी वाट आहे
🌈राहुल
[1/5, 23:00] Rahul Lale: खरंय...
आपल्या प्रवासाची वाट
आपली आपणंच शोधायची...
वाटेतल्या सावलीचीही पण
साथ नाही सोडायची
🌈 राहुल
👌🏻
कायमच मागे रहातात ठसे
पायांचे असो वा आठवणींचे
हरवतात ती माणसे
आठवण त्यांची देतात काही ठसे
🌈 राहुल
👌🏻कुणा कुणाच्या पायाचे हे ठसे?
चेहरे अनेक मला त्यात दिसतात कसे?
फिरतो जिथे मी ..तिथे शोधतसे
माझ्या स्वजनांचे हरवलेले ठसे
🌈 राहुल
सरतीच्या वर्षाच्या सविताला
सविता वाहते अर्घ्य
नवतेज उर्जा घेऊन
येईल उद्याचा सूर्य
🌈 राहुल
👌🏻👌🏻
प्रेमाचा प्रवास चाले
या हृदयी ते त्या हृदयी
प्रेमाचं गाजर जो दाखवी
नक्कीच समजावा तो निर्दयी
🌈 राहुल
👌🏻👌🏻👌🏻
मनातला नात्यांचा गुंता
अलगद सोडवू प्रेमाने
नातीचं जेव्हा रहात नाहीत
जीव तुटतो विरहाने
🌈 राहुल
👌🏻👌🏻
कस्तुरीचा सुगंध निसर्ग देणगी
सुगंध तिचा, माझं काहीच नाही
श्रेयाचा मज लोभ नाही
सुगंध
तिजला द्यावे
निर्माल्यासम विरावे
अर्पित होऊन जावे
🌈 राहुल
👌🏻👌🏻
कस्तुरी आहे मजपाशी
मला हे ठाऊक आहे
सुगंध जवळ माझ्या जरी
मृगनयनीची आस आहे
🌈 राहुल
Comments
Post a Comment