कविता आणि कवी
कविता आणि कवी
राहुल
सर्वांच्या कविता वाचून
मीही ठरवलं एखादी पहावी करुन
कसे बरं करतात पटापट, हे सगळे काव्य?
ट ला ट जोडतानाही मला, पार करावं लागतं दिव्य
शब्द कधी जुळले, तर त्यात अर्थ लागत नाही
अर्थ साधला गेला,तर शब्दांची जोड जुळत नाही
ओळीमागे ओळी लिहून नुसतं काही चालत नाही
वाचताना त्या मनाला भिडल्या नाहीत, तर काही खरं नाही
तेंव्हा पासून झालो मी शहाणा
कविता करण्याचा सोडला बहाणा
मनाला आता जे भावतं, ते नजरेनं टिपतो
शब्द स्फुरले कधी, तर शब्दांत उतरवितो
लिहितं झालो त्याला आता ,कविता मी म्हणत नाही
कवी आहे मी, म्हणायचं माझं धाडस नाही
©राहुल लाळे
Comments
Post a Comment