आला श्रावण
श्रावण येता
राहुल
श्रावण येता
राहुल
भरलेल्या आभाळातून श्रावण बरसेल
ऊन पावसाचा जणू खेळच रंगेल
मस्त सरींनी न्हाऊन घ्यायचं
तनामनाला चिंब भिजवायचं
हिरवाईची पैठणी लेऊन निसर्ग नटेल
मनाची लेखणी मुक्तछंद उतरवेल
सणवार येतील
घरादारात प्रसन्नता पसरवतील
नाती गोती आनंदित होतील
पर्यटक सहलीला निघतील
स्वादिष्ट पदार्थ खवय्यांना खुणावतील
मनाची मरगळ आता धुवून टाकायची
नव्याने फुलायची आस बाळगायची
श्रावणधारा भरभरून बरसू दे
तहानलेली धरती तृप्त होऊ दे
धुंद हवा मुग्ध करु दे
आभाळातील थेंब डोळ्यात उतरु दे
श्रावण आला.... आला श्रावण
आयुष्याचा श्रावण व श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळाचा आनंद मनमुराद लुटूया
©राहुल लाळे

Comments
Post a Comment