गवतफूल
गवतफूल....फूलमाणूस.....
राहुल
गवतफूल
लोकांचे मत ..
कधी वाईट, कधी चांगलं...
मर्जी त्यांची ...
बसवतील कधी डोक्यावर
तर कधी घेतील पायदळी...
मर्जी त्यांची..
फूलानं मात्र त्याचं ...फूलपण जपावं
बागेला फुलवावं, रानात सजावं
माळून घ्यावं कधी ललनेच्या केसात..
गुंफून घ्यावं हारात, कधी सुंदर गजऱ्यात
समर्पावे ईशचरणी, तर कधी कलेवरी
कमळ फुलतं, फुलतो गुलाबही
फुलुदे ना मग गवतफूलही
माणसानंही फुलाकडून काही शिकावं
जावे तिथे सुगंध पसरवावा
बरोबर आपल्या इतरांना खुलवावे
मळभ मनांचे दूर करावे
अर्पित करावे माझे मीपण
करावे सुगंधित सारे जीवन
होता ऐसं समर्पित जीवन
एक क्षणंच काय ...
युगानुयुगे होईल स्मरण
मग कोणी काही करो, काही म्हणो...
मर्जी त्यांची
©राहुल लाळे
०४-०७-२४
Photo courtesy...Sunil Vishwas

Comments
Post a Comment