जागेश्वर

 


*जागेश्वर - १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे मानले जाणारे ठिकाण*

 जागेश्वर धाम

राहुल 







५ वर्षांपूर्वी बिनसर - अलमोडा - नैनिताल - कॉर्बेट अशी उत्तराखंड मध्ये भटकंती केली होती .

बिनसरला गेलो असता १-२ दिवसांच्या तिथल्या लोकल भटकंतीनंतर जवळपास आणखी काय आहे ते पाहू असे सहज सर्च करताना सहज अल्मोड्यापासून ३० -३५ किमी अंतरावरती अति प्राचीन जागेश्वर नावाचे ठिकाण आहे कळले. नेटवर फोटो पाहिले आणि जायचेच  असे ठरले .

 

बिनसर -अलमोडा असे करत , मध्ये चहाच्या मळ्यातून वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचा स्वाद घेत दुपारी जागेश्वरला पोचलो. बिनसर ते अलमोडा आणि पुढेदेखील ओक, पाईन  आणि निलगिरीच्या आणि इतर झाडांनी नटलेल्या पर्वतमय प्रदेशातून हिंडताना प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही . जागेश्वर  जवळ आल्यानंतर एक मोठा फरक -निसर्गाचा एक वेगळाच आविष्कार  जाणवला तो  म्हणजे त्याभागात बाकीची झाडे कमी होऊन देवदार वृक्षांची संख्या वाढलेली दिसली . म्हणूनच या भागाला बहुधा "दारुका वन " असेही म्हणतात असे ड्रायव्हर कडून कळले . प्रत्यक्ष जागेश्वराच्या आवारात १२५ हुन अधिक लहान मोठी देवळे आहेत आणि आसपास मिळून अंदाजे २२५-२५० देवळे आहेत .

 

 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग असे सांगतो की गुप्त साम्राज्याच्या वेळेला  कुमाऊं मध्ये  कत्यूरीराजाच्या कारकिर्दीत आणि नंतर साधारण पणे २५०० वर्षांपूर्वी या मंदिरांची स्थापना झाली .  सर्व मंदिरे लाकूड , सिमेंट -वाळू आणि मोठं मोठ्या शिळांनी बांधलेली दिसली . एवढ्या दुर्गम प्रदेशांत त्याकाळी हि देवळे कशी बांधली असतील - आश्चर्यच आहे .  देवळांच्या चौकटींवर देव देवतांच्या प्रतिमा अलंकृत आहेत. तांब्याच्या जरी आणि देवदारच्या लाकडांचाही मुबलक वापर केलेला आढळून   आला .   

आद्य शंकराचार्यांनी या जागेश्वर - किंवा नागेश्वर - नागेश या ज्योतिर्लिंगाचे ची  स्थापना केली अशीही एक धारणा आहे .

 

पुराण असे सांगते - असे तिथे ऐकले की   शंकर आणि  सप्तर्षींनी येथे तपस्या केली होती . असे म्हणतात की जागेश्वर मंदिर येथे जी पण  मन्नत  मानली  जयाची ती प्रत्यक्षात उतरताच आणि त्याचा नंतर दुरुपयोग होऊ लागला - ऐकावे ते नवलंच !!!

 

आठव्या शतकात आद्य शंकराचार्य येथे आले आणि त्यांनी महामृत्युंजय करून  शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आणि  त्यानंतर  वाईट इच्छा करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत.तर यज्ञ आणि  अनुष्ठान करून   मंगलमय इच्छाच   फक्त पूर्ण होतील  अशी व्यवस्था झाली  - ही एक आख्ययिका  .

 

शंकराचार्यांच्या पुढील स्तोत्रात मात्र दारुकावनातील  नागेशचा उल्लेख नंतर आढळला  - वीसहून स्थापन केलेल्या १२ ज्योतिर्लिंगांतील हे आठवे

 

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।

उज्जयिन्यां महाकालमोकांरममलेश्वरम् ।

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् ।

सेतुबंधे तु रामेशं *नागेशं दारूकावने* ।

वाराणस्यां तु विश्वेशं त्रयंम्बकं गौतमीतटे ।

हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ।

ऐतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः ।

सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ।

 

जवळच एक वेगवेगळ्या शिवलिंग असलेले एक म्युझियम ही पाहायला मिळाले - फोटो काढायला अर्थात बंदी

 

बाकी पौराणिक संदर्भ  सोडले तरी एक अद्भुत विलक्षण निसर्गाने नटलेली आणि पुरातन  भारतीय स्थापत्याने नटलेली एक जागा तर पाहायला मिळाली हे भाग्यच

 

राहुल लाळे 

 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका