नववर्षाची पहिली सिंहगड वारी

 नववर्षाची पहिली सिंहगड सफारी...















मागच्या रविवारी जायला जमलं नाही पण आज मुद्दामच सिंहगड चढलो


सुंदर सूर्योदय, प्रसन्न वातावरण







आणि त्यावर सुचलेलं काही...


*नववर्ष*

राहुल लाळे


सरत्या वर्षाला दाखवून पाठ

चालुया आता नववर्षाची वाट


करूया थोडासा थाट-माट

आली  पहा रम्य पहाट


नवचैत्यन्याचे वाहतील वारे

नको विसरु या जुने सारे


चैत्यन्याचे  नवे धुमारे

उजवून टाकू आयुष्य सारे


नवीन स्वप्ने , नव्या आशा

नवीन आभा , अन  नव्या दिशा


जुन्या आठवणी, नव्या अपेक्षा

उमेद नवी,  अन नव्या आकांक्षा

सगळेच बरोबर घेऊन जाणे

मागील दुःखे सोडून देणे


नवा श्वास , नवा उत्साह

नव्या जोमाने पुढे जाणे


सारे डाव नव्याने मांडू, जुनी नाती सुदृढ करू


नवे खेळ चालू करू अन नवे सवंगडी जमा करू

*******"


आपल्या सर्वांना नववर्ष- २०२४ च्या पुन्हां एकदा

हार्दिक शुभेच्छा !!!


©राहुल लाळे 🌈

१३-०१-२०२४


सहसफरी...डॉ प्रसाद  वाळिंबे


आणि श्रमपरिहार.... पोहे, भजी, दही यांच्यावर यथेच्छ मारलेला ताव




फोटो... काही माझे, काही प्रसादचे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका