लता मंगेशकर

 " *ल* य आणि *ता* ल म्हणजे *लता* "

राहुल लाळे



शांत भक्तिगीते जिची ऐकून, सकाळ जागी होते   ती ...  *लता*


आश्वासक  आवाजाने जिच्या  दिवस उजाडू लागतो  ती ...  *लता*


मनमोहक सुरांनी जिच्या संध्या धुंद होते   ती ...  *लता*


हळुवार स्वरांनी थकवा दूर करणारी अंगाई गाते  ती ...  *लता*


बागेतल्या मंद हवेत जिची भावगीते ऐकावीत ती ...  *लता*


दूर डोंगरांवर जेव्हा ढग उतरतात तेंव्हा झाकोळून टाकते  ती ...  *लता*


झरझर झरणाऱ्या निर्मल पाण्यासारखी खळखळते ती ...  *लता*


नदीच्या शांततेचं आणि समुद्राच्या अथांगतेचं दर्शन घडवते ती ...  *लता*


ग्रीष्मात तळपते  श्रावणधारेसारखी बरसते भिजवून टाकते  ती ...  *लता*


थंडगार  हवेत मस्त गाण्यातून  पश्मीना शालीची उब देते  ती ...  *लता*


कृष्णाला आर्त साद घालून राधेचं प्रेम सादर करणारी ती ...  *लता*


मीरेचं भजन, ज्ञानोबाचं  पसायदान गाणारी ती ...  *लता*


आईची ममता, बहिणीची माया, मुलीचे आर्जव जागवते  ती ...  *लता*


उषेची लाली पसवुन आशेला दिशा दाखवते  ती ...  *लता*


आकाशाची निळाई मीनेवर चढवून  हृदयनाथवर सावली धरते  ती ...  *लता*


कुणीही गायलं तरी तिनं कसं गायलं असतं हे आठवून देणारी  ती ...  *लता*


ती सदा गातच रहावी, अशी कामना  खुद्द गानदेवताच करेल  ती ...  *लता*


भारतरत्नांच्या  मांदियाळीतील या  *ल* खलखत्या  ध्रुव *ता* ऱ्याला *लताला* जिथे असेल तिथे वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!!


©राहुल लाळे

२८-०९-

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका