सुखदुःखाच्या वाटा
सुखदुःखाच्या वाटा
राहुल
जीवनी सुखदुःखाच्या कठीण वाटा किती?
मार्ग त्यातून काढत जगायचं, सांगते आता मती
गलबत मनाचे कधीतरी भरकटत जाते
तरुन परी त्यास, शांत चित्ताचंं शीड नेते
नभात दिसतो तुटलेला एक आप्ततारा
डोळ्यांत हलकेच आसू अन् स्वरही होई कापरा
अर्थ आयुष्याचा सांगेल नभातील तोच मित्र
आठवणींच्या मायेची पाखरण वेचावी, जरी वाटे विचित्र
दिशादिशांना वाहू दे आता चैतन्याचा एक वारा
मनोमनी बरसू देत उत्साहाच्या उदम्य धारा
असतील अनेक असे सुहृद सहपांथस्थ
एकमेकां साथ देऊ अवघे धरु सुपंथ
@ राहुल लाळे
Comments
Post a Comment