थांब रे आता पावसा...

 थांब रे आता पावसा...


राहुल लाळे



थांब रे आता पावसा..


काम करुन थकलो

घरी परत जाऊ कसा?

थांब रे आता पावसा


चातकासम वाट तुझी पाहिली

आता खरंच सर्वांची वाट तू लावली

बरसताना आवडायचास

गरजताना हरखवायचास

पण आता झालास रे नकोसा...

थांब रे आता पावसा


रस्ते खचले, कुजली शेती

कचरा भिजला, डास त्रास देती

 ओले  रहाती कपडे

त्रासले गरीब बापडे

ठप्प झाले सारे 

कोंडून राहू कसा?

थांब रे आता पावसा


गाड्या वाहून गेल्या

जीवही गेले वाहून

कुटुंब निराधार झाली 

मानतो चूक आमचीही झाली

पाण्याचे वहाते मार्ग बंद ते केले

अनेकांचे होते नव्हते सर्व धुऊन तू नेले

थांब रे आता पावसा


आम्ही जरी विसरुन गेलो भान

तू आता थांबव तुझं होणं बेभान

गेले गणपती ..दसरा गेला

कोजागिरीचा चंद्र ही झाकोळून गेला

दिवाळीचा दिवा लावू तरी आता कसा?

थांब रे आता पावसा...


थांब रे आता पावसा


राहुल

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका