राधेचा कृष्ण
*राधेचा कृष्ण*
राहुल
राधेचा कृष्ण कृष्णाची राधा
धागा प्रेमबंधाचा अनोखा
डोळ्यातली स्वप्नं अनोखी
हररंगात एकमेकां रंगती
श्वासात तिच्या ध्यास त्याचा
प्राणाहून पूज्य मंत्र त्याचा
आस भेटीची इतुकी जीवा
पाण्यात पहाता स्वतःला
प्रतिमेतही पाही कान्हा
© राहुल लाळे

Comments
Post a Comment