वाढदिवस
*वाढदिवस*
राहुल
वाढदिवस ... जाणीव करुन देतो, मोठं झाल्याची
मन मात्र आठवण काढत रमतं.. लहानपणीची
आज संकल्प करायचा नवीन आशा आकांक्षांचा
दिवस आज.. मागील वर्षांच्या अवलोकनाचा
थोरामोठ्यांचे आशीर्वाद आज घ्यायचे
मित्रमंडळींच्या शुभेच्छात न्हाऊन घ्यायचे
मरगळ मनाची आज झटकून टाकायची
आस नवीन ध्येयाची कायमच धरायची
वय, आयुष्य , दिनरातीचे जीवनचक्र चालतच राहूदे
जोश-आनंद- उत्साह सदा वृद्धिंगत होऊ दे
आज आपण सर्वांनी मला दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद !!!
राहुल लाळे
१६-०८-२०२२
Comments
Post a Comment