या वयात सुध्दा

 *या वयात सुद्धा*

राहुल 


*या वयात सुद्धा*

का हो... असा का पडावा  प्रश्न  ?

या वयातंच  आहे की सगळं ...


कारण...


हे वय असं असतं, 

 जेंव्हा कशाचं भय नसतं

स्वप्नं  सत्यात  आलेली  असतात

कल्पना प्रत्यक्षात आणता  येतात


 हे वय असं असतं,

आपलं मन आपलं असतं

दुसऱ्याच्या मनातलं जाणता येतं

समोर कुणी नसलं तरी

आपलं आपण रमू  शकतं


उंच शिखरं, एखादी टेकडी

आता कसलीच भीती नाही

कधी उमेद कधी आराम

कुणी काहीच म्हणणारं  नाही


याच वयात ...

नजरेतले भाव आता पटकन  लक्षात येतात

हसणं-रडणं , खरं  खोटं लगेच सारं  कळून येतं  

अनेक भोग भोगून शहाणपणा आलेला असतो

निरागस आदर्शांना पोक्तपणाचा मुलामा चढलेला असतो

बेपर्वाई सरली जरी  थोडा उनाडपणाही बाकी असतो


एवढं सर्व असताना आता

कशाला उगाच कुढत  रहायचं

जसं जमेल - जेवढं झेपेल

*या वयात सुध्दा*

आयुष्य भरपूर जगून  घ्यायचं

आयुष्य भरपूर जगून  घ्यायचं !!!


*या वयात सुद्धा*


राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका