पाऊस

 

पाऊस

रा.



पाऊस कोसळतो
रस्ते भिजतात
मीही चिंबचिंब
पण आत कुठंतरी कोरडाच
मग उगाच वाटतं
पावसाबरोबर आपणही बरसावं
आतला कोरडेपणा
जलधारेबरोबर वाहून जावा
पुन्हा एकदा कराव्या
कागदाच्या होड्या
साचलेल्या पाण्यात
तरंगताना पहाव्यात
ओलं चिंब व्हावं
खोटा पैसा शोधावा
मडकं भरून घ्यावं...

उगाचंच मला वाटतं
कोसळणारा हा पाऊसही
आतून माझ्यासाखाच
कोरडा...
माझं मी समजू शकतो
पण हा  पाऊस ?
तो कोणासाठी रडतो ? ......

©राहुल लाळे 🌈

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका