अटलजी

 तीन वर्षांपूर्वी याच दिवशी अटलजी आपल्याला सोडून गेले


तेव्हा स्फुटललं

राहुल


आकाश अटल

पृथ्वी अटल

जल अटल

अग्नी अटल

वायू अटल

पंचतत्व अटल

चंद्रसूर्य अटल

सारे विश्व अटल

*अटलजींवरील*

 विश्वास अटल

आदर अटल

प्रेम अटल


*कालपासून फक्त मृत्यूलाच प्रश्न पडला असणार...*

*मी  का अटल आहे?*


देशप्रेम आणि राष्ट्रसेवा यांनी ओथंबून वाहणारं चालतबोलतं आदर्श व्यक्तीमत्व  आज काळाने आपल्यापासून हिरावून घेतलं.


शनिवार वाड्यावर १९७७ साली झालेलं भाषण ३रीत असताना ऐकलेलं...फारसं कळलं नव्हतं पण तो आवेश , आविर्भाव आणि जनसमुदायाला प्रभावित करणारं व्यक्तीमत्व मनात ठसलं ते कायमचंच.


सत्तेसाठी जेंव्हाआणिबाणी लादली  गेली तेव्हापासून राजकारणातून मूल्यांचा ह्रास झपाट्याने होऊ लागला.आजूबाजूच्या सामाजिक अध:पतनाचा मनावर कळतनकळत वाईट परिणाम होत होता आणि या सारया काळात सत्ता मिळूनही ती टिकवण्यासाठी कुठलाही अनितीचा मार्ग न पकडता राजिनामा देणारे अटलजी मनात ऊत्तुंग एव्हरेस्टप्रमाणे ठसले गेले जोडीला त्यांची शालीनता मृदु स्वभाव कविमन यासारख्या कितीतरी गोष्टी मनात घर करून होत्याच.त्यांच्याबद्दलचे हे प्रेम कमी व्हावे असे ते कधी वागलेच नाहीत आणि आदर द्विगुणीतच होत गेला आणि म्हणूनच आज मनातली मूल्यांची जपलेली

 प्रतिमा काळाने हिरावून घेतल्याचे दु:ख्ख जास्त आहे.मनाचा एक खंबीर आधार आज गेला.


🙏🏻🙏🏻🙏🏻


राहुल लाळे

१७-०८-२०१८



Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका