रेखा


 रेखा ,,,


राहुल




*आँखो में  महके हुए ख्वाब* जिचे पाहून आपलेही अंदाज खुमारतात... ती  रेखा

*आजकल पांव  जमीं पर नहीं पडते मेरे* म्हणताना आपलंच पाऊल घसरवायला लावते ... ती  रेखा

*पिया बावरी पिया बावरी* म्हणते जी  आणि उगाचंच कावरंबावरं आपल्यालाच करते... ती  रेखा

*जिंदगी जब भी तेरे बज्म में लाती है- ये जमीं चाँद से बेहतर * वाटायला मजबूर करते... ती  रेखा

*सून सून दीदी तेरे लिये इक रिश्ता आया है* असं म्हणताना हिच्याशीच रिश्ता बनवावा असं वाटू लागतं ... ती  रेखा

*मन क्यूँ बहका आधी रात को* म्हणताना  आपल्यालाही *रातभर ख्वाबमे देखा करेंगे तुम्हे " अशी  बहकवायला लावते ... ती  रेखा

*कतरा कतरा जीना है* म्हणत जगायची आस लावते... ती  रेखा

*सलाम-ए -इश्क* म्हणते ती, पण *उसके आगे की दास्तां* आपल्यालाच गायला लावते.... ती  रेखा

*इन आँखोंकी मस्ती में* गुणगुणताना तिच्याशी *जुस्तजू * करत * दिल चीज क्या है* आपलीच  जान घेणारी   .. ती  रेखा

*ये क्या जगह हैं दोस्तो* पासून *ये कहाँ आ गये हम*  पर्यंत *मजबूर हालात * *इधरभी और उधरभी* करून टाकते.. ती  रेखा

*परदेसीया  ये तूने  क्या किया ?*  असं मैत्रिणींसमोर विचारून *तुमने कभी किसीसे प्यार है?* असले प्रश्न टाकून भुलवते ... ती  रेखा

 *नीला  आसमान सो गया* म्हणून खयालात बुडवून टाकतांनाच "रंग बरसे* म्हणत अनेक रंग उधळवायला भाग पाडणारी  .. ती  रेखा

*गुम  है किसीके प्यार में*  असं सुबह- शाम  गायला लावून *अगर तुम ना होते*  तो *हमें  और जीने  की चाहत नहीं रहती* वो .... ती  रेखा

*अरे रफ्ता रफ्ता देखो आंख जिसे लडी है*  पासून *कैसी पहेली जिंदगानी*  पर्यंतच्या  प्रवासात अनेक सीमारेखा ओलांडून टाकते .. ती  रेखा


सदाबहार रेखाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


@राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका