इरफान
इरफान खान ...एक गुणी अभिनेता आणि त्याच्या कलेला आपण मुकलो...
परवाच त्याचा हिंदी मिडीयम परत पाहिला होता
संवादफेकीची वेगळी स्टाईल, अंडर प्ले, सहज अभिनय म्हणण्यापेक्षा कॅरॅक्टर मध्ये घुसून काम करण्याची शिताफी अविस्मरणीय...
त्याची सिरियल टीव्ही वर पाहिली होती..बनेगी अपनी बात, चाणक्य, चंद्रकांता, भारत एक खोज तेव्हापासून आता
पानसिंग तोमर, मदारी करीब करीब सिंगल तलवार ब्लॅकमेल लंचबाॅक्स कारवां पिकू सारेसारे आठवताहेत.
मकबूल, आन, लाइफ इन मेट्रो , लंचबॉक्स, हासिल, हैदर....या सिनेमापर्यंत त्याची रेंज विलक्षण होती
अगदी सहज अभिनय—किंबहुना अभिनय करतोय असे वाटू न देणे हीच त्याची खासियत होती.
संवादफेकीची त्याची अशी खास शैली होती.हिरो चे कुठलेही गुण नव्हते त्याच्यात तरी भारून टाकायचा कायम.
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🏻🙏🏻🙏🏻
कुठंतरी वाचण्यात आलं ...इरफानला चमेलीची फुलं खूप आवडायची....
त्यावरून सुचलेली काही वाक्ये...
*चमेली आणि इरफान*
राहुल
हातावरच्या रेषांनीही
त्याला काही सांगितलं होतं...
चमेलीच्या सुवासामध्ये
त्याने ते शोधलं होतं
सरलेल्या एकेका श्वासात
त्याच्या तो सुगंध होता
त्याच्या बरोबर नक्कीच तो
चमेली ती घेऊन गेला
अन्
त्याच्या आठवणीत आपल्याला ही
दरवळ तो देऊन गेला....
इरफान...🙏🏻
©राहुल लाळे
२९-०४-२०२०

Comments
Post a Comment