हनुमान जंन्मोत्सव

 *हनुमान जन्मोत्सव*

राहुल





ज्याच्या हृदयी सदैव राम,

चरणी ज्याच्या चारी धाम I

सर्वकाही जो करतो दान

अंजनीपुत्र तो हनुमान II


तो सुखदायक, तो दुःखहारक

सत्यसहायक तो, तो संकटविनाशक I

ध्यान-ज्ञान, शक्ती-मुक्ती-भक्तीचा विधाता

लोकनाथ जगन्नाथ प्रसन्नमुखी हा हनुमंता II


 गर्वहारी तू,  तू गदाधारी

दर्शन तुझे सदा शुभकारी I

महाबळी तू, तू प्राणदाता

तू दीनानाथ हे हनुमंता II


विराटरुपी तू, तूच सूक्ष्मरुपी

विहार तुझा असे तिन्ही लोकीं I

पर्वत ही कापे, तू क्रोधित होता

नमन आज तुज हे अंजनीसुता II


राहुल लाळे

१५-०४-२०२२


पवनपुत्र हनुमान की जय 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका