द कश्मीर फाईल्स
*द कश्मीर फाईल्स .. एक जळजळीत अंजन*
राहुल लाळे
आपली एखादी वस्तू हरवली तर आपण शोधायचा प्रयत्न करतो - मिळाली तर सांभाळून ठेवतो - नाहीच मिळाली तर हळहळतो, ती वस्तू आवडती असो व नावडती आपल्याकडून कुणी घेतली बळकावली तर?.. ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो पण घेणारा ताकतवान आणि गुंड प्रवृत्तीचा असला तर .. सोडून देतो - नवीन घेतो –
पण एखाद्याने आपलं घरच बळकावले तर ? नेसत्या वस्त्रांनिशी आपल्याला घराबाहेर काढलं तर? आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या आयाबहिणीमुलींवर अत्याचार करून, घरातल्या लहानमोठ्या व्यक्तींची हत्या करून आपल्याला कोणी देशोधाडीला लावलं तर? , तेही आपल्या स्वतःच्याच देशात ? तर काय अवस्था होईल आपली ? कुठे जाऊ आपण ? …
कल्पना करवते ?... नाही ना ?
*वसुधैव कुटुंबकम* " अशी धारणा बाळगून सर्व जगाला आपलं घर मानणाऱ्या व सर्व जगाला आपले दरवाजे सदैव उघडे ठेवणाऱ्या , आपल्याच देशात आपल्याच भाऊबंदांना फार पूर्वी नाही - फक्त ३०-३२ वर्षांपूर्वी , पृथ्वीवरील स्वर्ग, देशाचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरमधून कसं निर्दयतेने अमानुषपणे निर्वासित केलं गेलं आणि त्यांची बाजू घेणं राहूं देत - त्यांच्या दुःखाला- वेदनेला आत्तापर्यंत नीट कोणी वाचाही फोडली नाही. इतरांबद्दल काय बोलायचं? मीही त्यावेळी २०-२१ वर्षांचा होतो - तेव्हापासून आत्तापर्यंत मला यातलं किती माहिती होतं ? जाणून घेण्याचा प्रयत्न मी -माझ्या पिढीने किती केला ? ज्यांनी केला त्यांनी पुढं काय केलं ?
हे सर्व व्यक्त होण्याचं कारण म्हणजे रविवारी पाहिलेला विवेक रंजन अग्निहोत्रींचा "द कश्मीर फाईल्स ". ज्यांना खरोखर एक संवेदनशील मन आहे त्यांनी वर उल्लेख केलेला विदारक अनुभव कसा असू शकेल हे जरूर पहा !
पण हो , फक्त काश्मिरातील हिंदूं पंडितांबाबत जे घडले, तेवढंच पाहण्यासाठी हा सिनेमा पाहू नका तर तुमच्या अन माझ्याही कुटुंबांबाबत जर असं घडलं तर? , याचं भान येण्यासाठी हा सिनेमा पाहा.
पण खरोखर हा सिनेमा होता ? बाकी सिनेमांसारखं याचं प्रमोशन कुठंच नव्हतं - बॉलिवूडच्या स्टार्स कडूनच नाही, तर गेला बाजार कपिल शर्मा शो वर पण प्रमोशन नव्हतं . स्टार कास्ट फारशी मोठी नाही - हिरो-हिरोईन नाही - गाणी नाहीत सिनेमात -सध्या चलतीत फारसे नसलेले म्हणजे मिथुन चक्रवर्ती व अनुपम खेर ( पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर , मृणाल कुलकर्णी आपले मराठीतले सोडून ) व दर्शन कुमार याला ओटीटी वर पाहिलेलं. आणि शिवाय अनेक ठिकाणी तर निगेटिव्ह पब्लिसिटी...
खरं सांगतो रविवारी सिटीप्राईडला कश्मीर फाईल्स पाहायला जी १७० मिनिटे होतो... खरंच हललो .. एखादी कलाकृती पडद्याच्या बाहेर - थिएटरच्या बाहेरही ती कशी आपल्याबरोबर येते? - ते नक्की जाणवलं !
पावणेतीन तास कितीही भयंकर दृश्य समोर पाहून न मिटलेले - सताड उघडे ठेवलेले डोळे - संताप, वेदना, भीती , दहशत , अगतिकता, आक्रोश पाहून बधिर झालेले - पाणावते होऊनही शुष्क बधिर झालेले डोळे - खरंच रात्रभर डोळे मिटलेच नाहीत.
अगदी गुजरात दंगलीवर, गांजाकस संजूवर , मुंबई बॉम्बस्फोटावर ही सिनेमे निघाले - ज्यूंवर अत्याचार झालेल्या " शिंडलर्स लिस्ट" व अनेक चित्रपट इथे गाजले पण जगात सर्वात जास्त सिनेमे बनवणाऱ्या आपल्या देशात एक जिवंत इतिहास पाहायला ३० वर्ष लागावीत ? जगाच्या कानाकोपऱ्यात खुट्ट झाल्यावर , अगदी ९/११ , जगभरातली युद्धांपासून - विहिरीत पडलेल्या मुलांपर्यंत - राजकारण्यांच्या- स्टार्सच्या गॉसिप पर्यंत सगळं दाखवणाऱ्या मीडियाने हा आक्रोश अंडर द कार्पेट का ठेवला इतकी वर्ष ? का माहिती असूनही आपणच मुर्दाडासारखं दुर्लक्ष केलं याकडे ? शिंडलर्स लिस्ट ला ऑस्कर मिळाल्यावर स्पीलबर्ग म्हणाला होता " Please do not allow the Holocaust to remain a footnote in the history…please listen to the words, echoes and the ghosts” - या घटना तर ८० वर्षांपूर्वीच्या - पण काश्मीरमधली तर ३२ वर्षांपूर्वीचीच –
आणि सगळी दुःखं, सगळ्या वेदना, जखमा काळाबरोबर खरंच क्षमतात ? नाही ना ?
भोपाळ दुर्घटना, मुंबई बॉम्बस्फोट, गुजरात दंगल, बाबरी मशीद , शाहबानो, मालेगाव अशा अनेक घटनांच्या वेळी आक्रमकरित्या संवेदनशीलता दाखवणारे मानवतावादी, समाजसुधारक साधारणपणे याच वेळी घडलेल्या या अत्याचारी घटनांचे कुठेच कसे पडसाद उमटले नाहीत? अगदी ज्यांच्या आईवडिलांना -आजीआजोबांना जे दुःख भोगायला लागलय त्यांचंही ब्रेनवॉश करून असं काही घडलंच नाही हे पटवण्यापर्यंत सिस्टीम जाते ?
पण कितीही कोंबडा झाकला तरी सूर्य उगवतोच - "Truth is any time stronger than fiction !!”’ –पल्लवी जोशी , विवेक अग्निहोत्री या युगुलानी व त्यांच्या पूर्ण चमूने ४ वर्ष अविरत कष्ट करून, रिसर्च करून , ७०० हुन अधिक जणांचे अनुभव ऐकून बनवलेला हा चित्रपट तेच नागडं सत्य समोर आणतो.
काश्मीरमधून विस्थापित होऊन आलेले व डिमेन्शियाने पीडित पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) आणि त्यांचा ANU या प्रसिद्ध विद्यापीठात शिकणारा नातू कृष्णा (दर्शन कुमार) यांच्याभोवती जवळजवळ ३ तासांची ही कथा चालते. त्यांच्या भोवती वावर आहे तो - पुष्करनाथांच्या दर्दनाक कहाणीचे साक्षीदार असलेले त्यांचे काश्मीरमधले जुने चार मित्र - पूर्व आयएएस ऑफिसर ब्रह्मदत्त (मिथुन), डीजीपी हरिनारायण (पुनीत इस्सार), डॉक्टर महेश (प्रकाश बेलवडी), आणि पत्रकार विष्णूराम (अतुल श्रीवास्तव) तसेच ब्रह्मदत्त यांची पत्नी लक्ष्मी (मृणाल) यांचा आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणींचा.
सिनेमात हिरो-हिरोईन नाहीत पण व्हिलन मात्र आहेत - ते म्हणजे विभाजनवादी खूंखार फारुख मलिक बिट्टा आणि त्याचे क्रूर सहकारी. विभाजनवाद्यांबद्दल सहानुभूती असलेलं शासन-राजकारणी, असंवेदनशील मीडिया , आणि देशाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी उभारलेल्या विद्यापीठातली एक प्रातिनिधिक प्रोफेसर राधिका मेनन - जी काश्मीरमध्ये विभाजनवाद्यांकडून होणाऱ्या हिंसेला *आझादीच्या लढाईचा* रंग देते , इतका की "अफझल हम शरमिंदा है - तेरे कातिल जिंदा है" , " भारत तेरे तुकडे होंगे" अशा घोषणा आपल्या देशाच्या या भावी नागरिकांकडून मारून घेण्याच्या शिकवण्या घेते !!
काश्मीरच्या एरवी डोळे दिपवून टाकणाऱ्या बर्फाच्छादित सौन्दर्याची जाणीवही न होऊन देणारी पण अंगावर काटा आणणारी पार्श्वभूमी ही सिनेमातली आणखी एक महत्वाची व्यक्तिरेखाच. काही वर्षांपूर्वी काश्मीरला पर्यटनाला गेलो असताना श्रीनगर एअरपोर्टवर उतरलो तेंव्हा बाहेरचा बंदोबस्त आणि शिकाऱ्यापर्यंत जाओस्तोवर सुनसान रस्ते पाहून कळालं की राष्ट्रपती श्रीनगरमध्ये येणार म्हणून बंद पुकारला होता . रस्त्यांवरचा तेव्हाचा शुकशुकाट आणि काश्मीर फाईल्स मध्ये दाखवलेले भेदरलेले रस्ते आणि - " Indian Dog Go Back " यासारख्या घोषणांनी रंगवलेल्या भिंती यांचा संबंध मला आज लक्षात आला.
या सिनेमातला प्रत्येक जण आपली भूमिका जगलाय. अनुपम खेर कदाचित स्वतः काश्मिरी असल्यामुळे पुष्करनाथ अक्षरशः जगलेत. स्वतःचा मुलगा, सून आणि नातू ( सिनेमात कृष्णाचा मोठा पण वयाने लहानगाचं असलेला शिव ) यांची घृण हत्या प्रत्यक्ष आपला विद्यार्थ्यांकडूनच होताना डोळ्यासमोर पाहूनही हिंसेचा विचारही डोक्यात न येता कलम ३७० हटवा अशी लेखी मागणी वर्षानुवर्षे करत, लहान कृष्णाला मोठा करणारा - कृष्णाच्या काश्मीरबद्दलच्या विचारांनी उद्विग्न होणारा आजोबा - नातवांना भात खायला मिळावा म्हणून बिस्कीट फक्त तोंडाजवळ नेऊन परत डब्यात ठेवणारा आजोबा अनुपमजींनी खरोखरच जगवलाय. त्यांची "सपने ऐसे पुरे नहीं होते, उनके पीछे भागना पडता है", “Impossible takes time but you must keep hope” ही आणि काश्मिरींमधून मधून " मुझे ठंड लग रही है" सारखी वाक्य अंगावर काटा आणतात. त्यांच्या मुलाच्या व सुनेच्या हत्येची दृश्यही अंगावर सरसरीत काटा उभी करत थिजवून टाकतात... बी के गंजू व गिरीजा टिक्कू यांच्या त्यावेळी झालेल्या हत्येवर आधारित. अमानुषपणाचा अक्षरशः कळस !!!
दर्शन कुमार हा कृष्णा पंडित कॉलेजमधला विद्यार्थी म्हणून मोठा वाटतो - पण एक काश्मिरी पंडित म्हणून आजोबांकडून मिळालेली माहिती आणि महाविद्यालयातलं ब्रेन वॉशिंग यामध्ये बनलेली त्रिशंकू अवस्था व त्यातली तगमग-घुसमट दाखवत सहजतेने वावरतो. ब्रह्मदत्तच्या घरातल्या कुटुंबाच्या फोटोत आपले आईवडील कोण? हे विचारतानाची त्याची मनस्थिती , विभाजनवादी नेत्याशी बोलून बाहेर पडल्यानंतर आणि आजोबांच्या मित्रांकडून एकेक सत्य ऐकल्यानंतर मनात उचंबळून येणारी दोलायमान भावना त्याने छान व्यक्त केली आहे. कॉलेजमधल्या शेवटच्या भाषणात तर तो नवखेपण झुगारून फारच भाव खाऊन जातो.
" टूटे हुए दिल बोलते नहीं, उन्हे सुनना पडता है" , " झूठी बात दिखाना उतना बुरा नहीं , जितना सच्ची बात छुपाना है", "काश्मीरका सीएम पक्का सेक्युलर है -दिल्लीमे नॅशनॅलिस्ट, जम्मूमे कम्युनिस्ट औ काश्मीरमे कॅम्युनलिस्ट", " बिकने को तैय्यार है, तो बाजार खुला है" , "काश्मीर जैसे जन्नतको जहन्नम करनेवाले जिहाद इस लिये करते है की उनको जन्नत मिले " "तुम्हे पद्मश्री सायलेंट रहनेकी ही तो मिली है", " Exodus नहीं वो Genoside ही था"अशा पुष्करनाथांच्या मित्रांच्या संवादातून आणि फ्लॅशबॅक मधून काश्मिरी पंडितांची विदीर्ण कहाणी आपल्या डोळ्यासमोर येते . या सर्व कलाकारांनीही आपापल्या भूमिका न करता प्रत्यक्ष जगल्या आहेत.
पल्लवी जोशीने प्रो राधिका मेनन एक्दम सहजतेने साकारलीये - "लोग भगवान को मानते है - किसी भरोसेकेलिये - आशा के लिये - हमे उनकी होप बनना है - इसीलिये किसीको - याने की सरकारको व्हिलन बनाना है", "गव्हर्नमेंट उनकी होगी, लेकिन सिस्टीम तो फिरभी हमारी है" - असे प्रोफेसर कॉलेजमध्ये असतील तर विद्यार्थी कसे निपजतील - हे वेगळं सांगायला नको. तिच्या तोंडी माझ्या आवडत्या शायरचं ( फ़ैज अहमद फ़ैज यांचं) " हम देखेंगे" ही गजल आहे - ती म्हणजे universal anthem of protest & hope अशी आहे - फ़ैजनी ती झिया उल हक यांच्या विरोधात लिहिली होती म्हणे - पण सिनेमात ती सैतानामुखी श्लोक - "Devil quoting Bible " अशीच वाटते. शाहीनबाग मधले आंदोलकसुद्धा हे राष्ट्रगीत(?) म्हणायचे म्हणे !!!
पडद्यावर डोळे खिळवत ठेवून मनाचा थरकाप उडवण्यात फारुख अहमद दर उर्फ बिट्टाचं पात्र उभ्या करणाऱ्या चिन्मय मांडलेकरचाही मोठा हातभार आहे. रलीव, गलिव, सलीव ( मुस्लिम बना , नाहीतर मरा , नाहीतर पळा ) अशा त्याने व त्याच्या विभाजनवाद्यांनी दिलेल्या आरोळ्यांनी प्रेक्षकही खुर्चीचेही हात घट्ट भरून बसतो. काही दिवसांपूर्वी फतेशिकस्त व पावनखिंड मध्ये छत्रपती शिवाजी साकारलेला चिन्मय हाच का ? असा प्रश्न पडावा असं काम चिन्मय ने केलंय, हेच त्याच्या अभिनयाचं यश !! " Azad Kashmir, Without Hindu Men, With Hindu Women!!" असे फतवे सिनेमा पाहतानाच शहारे आणतात तर प्रत्यक्षात परिस्थिती कशी असेल?
पुष्पेंद्रनाथांच्या अभागी सुनेचं काम केलेल्या भाषा सुम्बलीने व इतर अनेक अनोळखी चेहऱ्यांनीही द कश्मीर फाईल्स मध्ये आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे .
हे सर्व सादर करताना ही एक डॉक्युमेंटरी बनत नाही, कुठेही सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार नाही- VFX वगैरे टेक्नॉलॉजी नाही पण कॅमेरा व्यवस्थित सर्व अँगल्स मधून फिरलाय आणि आपल्याला ३६० अंशातून विचार करायला भाग पडते हे नक्की - रविवारी पाहिला पण एवढा हललो होतो की - बाहेर आल्यावर २ दिवस बधिर होतो - काल परत पाहिला - तो समजून घ्यायला .
आणि खरंच एक जळजळीत अंजन या लोकांनी डोळ्यात घातल्यासारखं वाटलं - अनेक प्रश्न मनात आले - अनेक विचार डोक्यात आले…
१. आपण कायम फक्त एकच बाजू ( साईड ) घेतली पाहिजे का ? लेफ्टिस्ट-पुरोगामी किंवा उजव्या विचारसरणीची ? मी एक मध्यममार्गी - सरळ चालणारा - मानवतावादी असू शकत नाही ? एक माणूस मग तो कुठल्याही धर्माचा का असेना त्याच्यावर अन्याय होत असताना - फक्त त्याचा धर्म पाहून आपण त्याच्याबद्दल सहानुभूती किंवा राग मानायचा ?
२. राजकीय निर्णयांमुळे एखाद्या माणसाच्या - एका समाजाच्या मूलभूत जगण्याच्या अधिकारावर गदा येणं आणि दुसऱ्यांना अमर्याद बेबंद अधिकार व सुरक्षा - असं का ?
सर्वांना समान अधिकार - सुरक्षा कधी मिळणार?
३. एखादी गोष्ट उशिरा समजली किंवा एखाद्या अन्यायाला उशिरा प्रकटता मिळाली तर झालेला अन्याय बदलतो का ?
४. फारुख बिट्टा सारखा माणूस सरळ सरळ १५-२० जणांचा खून केला म्हणून कॅमेरात बघून सांगतो - मग तो मोकळा का हिंडतो ?
५. पुण्यात एक गवा येतो - आणि गर्दीमुळे जीवाला मुकतो किंवा इतर कुठल्या प्रसंगात मुक्या जीवाला प्राण गमवावे लागले तर PETA सारख्या संस्था आक्रोश करतात तर एवढे हजारो लोक मारले गेले अत्याचार झाले- - लाखो निर्वासित झाले याबाबदल ह्युमन राईट्सवाले पण काहीच बोलत नाहीत ?
६. फॉरेन मीडियासमोर किंवा एरवीही मीडिया "कॅमेरा ऑन - मातम ऑन - कॅमेरा ऑफ मातम ऑफ" एवढी असंवेदनशील कशी होऊ शकते ?
७. काश्मीर किंवा इतर ठिकाणीही एखाद्या समाजावर हल्ला झाला की दुसराही शस्त्र हातात घेऊन प्रतिहल्ला करतो - इथं तसं झालेलं नाही - म्हणून पिडीतांनी सोसलंच नाही असं म्हणायचं ? पुष्करनाथ सारख्या माणसांनी हजारो पत्र लिहून प्रतिकार केला - बंदूक उचलून नाही हे का पाहिलं जात नाही ?
८. कॉलेजमध्ये ज्ञान, माहिती,संस्कृती , कला आणि राजकारणही इत्यादी विषयांत विद्यार्थ्यांना प्रवीण करून पुढील सुजाण नागरिकांची पिढी तयार करून देशाचं भविष्य उज्ज्वल करण्याचं ध्येय समोर असताना , त्यांना आपल्या एका अजेंड्यात गुंतवून त्यांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न किती योग्य आहे ?
९. काश्मीरी पंडित निर्वासित झाले असं म्हणलं जातं - तो भारतीय नाही ? बांगला देश आणि इतर ठिकाणांहून आलेल्या निर्वासितांची काळजी आहे पण भारतीय म्हणून त्याच्यावर झालेला अन्याय कधी स्वीकारला जाणार ?
१०. काश्मीरमध्ये JKLF किंवा इतर दहशतवादी संघटनावाद्यांनी फक्त हिंदूंनाच नाही तर काश्मीरला भारताचाच अविभाज्य घटक मानणारे मुस्लिम, ख्रिश्चन , शीखांनाही मारलं - त्याबद्दल वाईट वाटलंच पाहिजे - मग सिनेमा पाहून बदला घेऊ- आग पेटती ठेवू हे म्हणणं चुकीचंच पण बेफिकीर राहणंही चुकीचंच !!!
११. Right to Justice हे फक्त ठराविक समाजासाठीच का ? आपली राजकीय धारणा बाजूला ठेवून मानवतावादी आणि आशावादी दृष्टिकोनातून आपलेच भाऊबंद असलेल्या पीडितांकडे आपण का पाहत नाही ?
१२. आता ३०-३२ वर्षांनी काश्मीर सोडून इतरत्र विखुरलेल्या पंडितांचे पुनवर्सन सोपे असेल? तेव्हा आपलं गाव-घरदार- नोकरी-नातेवाईक सगळे देशोधडीला लागले त्यांची तर पिढीच संपून गेली आहे - पुढची पिढी तिथं परत जाऊन काय करेल ? त्यांना तेच अवसर परत मिळतील ?
१३. अशी वेळ परत येणार नाही त्यासाठी काय उपाय असतील ? आपल्याच शेजाऱ्याला आतंकवाद्यांच्या हवाली करायला आपल्याला शरम कधी वाटणार ?
१४. पंडितांना बाहेर काढूनही काश्मीरमधला हिंसाचार संपलेला नाही.. तो का ?
१५. अतिरेकी - विभाजनवादी यांचा एक अजेंडा असतो - त्यांना जे बरोबर वाटतं ते करतात - आपल्याला काय बरोबर वाटतं याचा विचार आपण केलाय? आपला अजेंडा काय असणार आहे ?
१६. कलम ३७० रद्द करून काश्मीरला मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न चाललाय तो स्तुत्य आहे पण यापुढेही तो प्रामाणिकपणे राजकीय अजेंडे बाजूला ठेवून केला जाईल ? तीन प्रकारचे गट असतील - एक विभाजनवादी - एक भिंतीवरचे - इकडे का तिकडे त्यांना माहित नाही - एक पूर्ण राष्ट्रवादी -भारतीय .. या सर्वांना त्यांच्या गटाप्रमाणे सांभाळून-समजावून-दरडावून भारताच्या विकासाची फळं काश्मीरलाही चाखायला मिळतील ?
१७. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातल्या बहुतेक साऱ्या दहशतवादी घटनांत एका ठराविक समुदायाच्या व्यक्तीच का असतात याचा विचार आपल्याबरोबरच त्याही समुदायाच्या सर्व व्यक्तींनी करायला नको का ? धर्माच्या नावावर देशविरोधी कारवाया - हिंसाचार करण्याचा विरोध सर्वधर्मियांनीच करायला नको का ?
असा विचार झाला तरी पुन्हा वेगळं काश्मीर , वेगळा प्रांत होणार नाही - कोणालाही आपल्या घरातूनच बेघर होण्याची पाळी येणार नाही !!
ती भयंकर वेळ आपल्यावर येऊन परत असं अंजन घालून घ्यायची वेळ येऊ नये हीच आशा !!! त्यासाठी तरी हा सिनेमा नवीन पिढीबरोबर जरूर पहा.
आणि ते प्रस्तुत करण्याचं धाडस ताशकंद फाइल्सनंतर परत दाखवल्याबद्दल विवेक,पल्लवी आणि टीमचं हार्दिक अभिनंदन !!!
जय हिंद !!!
राहुल लाळे

मी "सरसेनापती हंबीरराव"चा ट्रेलर पाहिला. त्यांचं रौद्र रक्तबंबाळ रूप.. पावनखिंड मधील बाजीप्रभूंचं तसंच..
ReplyDeleteहे पाहाताना आपल्याला त्यात काही गैर, squeamish वाटत नाही. मग काश्मीर फाईल्सच्या सुष्टदुष्ट या श्वेतकृष्ण विभागणीबद्दल का वाटतं?
इस्लामी आक्रमण आणि क्रौर्य शक्यतो dilute करून सांगायचं या इतिहासशिक्षण धोरणाचा तो परिणाम आहे. आत्ताच्या मुसलमानांना काय वाटेल या भीतीपोटी ही रंगसफेदी केली गेली. हे खरं तर मुसलमानांवर अन्यायकारक आहे पण असंच चालू आहे..
मेनस्ट्रीम हिंदी सिनेमांनी टोकनिझमची इतकी सवय लावली आहे.. एक दुष्ट मुसलमान पात्र असेल तर लगेच एक पापभीरू मुस्लिम मौलवी असतोच.
एक बलात्कारी ब्राह्मणपुजारी दाखवला की एक गरीब सज्जन ब्राह्मण दाखवतातच.
अग्निहोत्रींनी हे जाणीवपूर्वक टाळलं.
Excerpt from Arun Shourie's book "Eminent Historians"
ReplyDeleteUnder the CPM govt in Bengal a circular dated 28 April, 1989 is issued by the West Bengal Secondary Board. It is in Bengali, and carries the number "Syl/89/1" (For Class-9. Here “Aushuddho” supposedly means “impure” and “Shuddho” is “cleanse” by alteration or by deletion)
Book : Bharatvarsher Itihash, by Dr. Narendranath Bhattacharya, published by Chakravarty & Son:
Page 89 : Aushuddho - "Sultan Mahmud used force for widespread murder, loot, destruction and conversion."
Shuddho - "There was widespread loot and destruction by Mahmud." That is, no reference to killing, no reference to forcible conversions.
Page 89 : Aushuddho - "He looted valuables worth 2 crore dirham from the Somnath temple and used the Shivling as a step leading up to the masjid in Ghazni."
Shuddho - "Delete 'and used the Shivling as a step leading up to the masjid in Ghazni.'"
Page 112 : Aushuddho -- "Hindu-Muslim relations of the medieval ages is a very sensitive issue. The non- believers had to embrace Islam or death."
Shuddho -- All matter on pages 112-13 to be deleted.
Page 113 : Aushuddho - "According to Islamic law non-Muslims will have to choose between death and Islam. Only the Hanafis allow non-Muslims to pay jaziya in exchange for their lives."
Shuddho - Rewrite this as follows: "By paying jaziya to Allauddin Khilji, Hindus could lead normal lives." Moreover, all the subsequent sentences "Qazi...", "Taimur's arrival in India..." to be deleted.
Page 113 : Aushuddho - "Mahmud was a believer in the rule of Islam whose core was 'Either Islam or death'.
Shuddho -- Delete.