होळी
*होळी*
राहुल
थंडी संपून उन्हाची चाहूल
म्हणजे होळी
स्वाद घ्यायला पुरणपोळी
म्हणजे होळी
मरगळ काढून उत्साह भरला जाणं
म्हणजे होळी
तरुणाईचा सोहळा
म्हणजे होळी
वार्धक्याला उजाळा
म्हणजे होळी
एकमेकांचे रंग एकत्र मिसळणे
म्हणजे होळी
मनातील वाईट घटना , वाईट विचार विसरणे
म्हणजे होळी
अन्यायावर न्यायाची मात
म्हणजे होळी
उज्वल भविष्याची स्वप्ने उजळवणे
म्हणजे होळी
माणसावरील, स्वतःवरील विश्वास
म्हणजे होळी
अंधारावर प्रकाशाचा विजय
म्हणजे होळी
उत्फुल्ल होऊन जीवनात रंग भरणे
म्हणजे होळी
©राहुल लाळे
Photo...
१.बाल्कनीत सजलेली फुलांची रंगोली
२.30 वर्षांपूर्वी रायगडावर साजरी केलेली होळी
३. चित्र...Courtsey मित्र आणि प्रख्यात चित्रकार Vikas Patnekar
Comments
Post a Comment