मोर मनातला

 मोर मनातला

राहुल


मोर मनातला 

पिसारा फुलवतो

स्वानंदे नाचतो

मोर मनातला


काळजीचे मेघ

चिंतेच्या वीजा

भणाणा वारा

गडगडाटी आवाज

वाट पावसाची

 पहातो

मोर मनातला


आयुष्य वेगाचं

धावायचा वेगानंच

अंतर जरी खूप दूर

पार पाडे सहजी

पकडून तालसूर

मोर मनातला


वेग मंदावला

धावणं थांबलं

वाराही थांबला

नाचणं मात्रं


नाही विसरला

मोर मनातला


बदललं वारं

मेघ बरसले

जीव सुखावला

पिसारा फुलवे

नाचे आनंदे 

मोर मनातला


राहुल लाळे




Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका