नाती जिव्हाळ्याची
नाती जिव्हाळ्याची
राहुल
सूर्य चंद्र तारे इंद्रधनु
आकाश पहा सजते आहे
पाऊस पडता कधी
बीज नवे अंकुरते आहे
बाजूला एखादी नदी
संथपणे वाहते आहे
सुखदुःख सामावूनी
गारवा ती फैलावत आहे
फुले सुगंधित ,तन प्रफुल्लित
रागद्वेष सारा वितळूनी जात आहे
जादुगार निसर्ग हा विलक्षण..
श्रांत मनालाही खुलवत आहे
डोलणारी ही गवत पाती
जिव्हाळ्याची जणू नाती
जपत हळूवारपणे त्यांना
आनंदाने जगायचं आहे
सहजीवनातच या आता
जीवनाचे सार आहे
जीवनाचे सार आहे
राहुल लाळे 🌈
२४-०९-२०२१


Comments
Post a Comment