कृष्ण ...कृष्णभक्त होणंही सोपं नाही
*कृष्ण ...कृष्णभक्त होणंही सोपं नाही
*
राहुल
राधा आहे मजसमीप
कृष्ण होणं जमेल का?
वाट हरवली जयांची
सारथी तयांचा होणं जमेल का?
हरवले आभाळ जयांचे
त्यांचे छत व्हायला जमेल का?
प्राजक्ताच झाडं तू
सडा झेलण्यास तुझा
अंगण व्हायला जमेल का?
सत्य शिव सुंदर तू
ध्यास मनी सदा राहील का?
कृष्ण बनणं सोपं नाहीच
कृष्णभक्त तरी बनणं जमेल का?
©राहुल लाळे
चित्रे....
सुचित्रा गोखले, मधुरा आगाशे

Comments
Post a Comment