रेषा भाग्याच्या

 


*रेषा भाग्याच्या*
राहुल

रेषा भाग्याच्या आता सर्व तुझ्याच आख तू
सुखदुःख सारे तुझे,  तुझेच शोध तू

बंधनांना साऱ्या आता, तुलाच हद्दपार करायचे
मोकळेपणाच्या चष्म्यातून जगाकडे पहायचे

रेषेने रेषा जोडायची, हिम्मत तुझीच आहे
नजरेनेच काम व्हावे, ताकद तुझ्यात आहे

पुरुषाच्या मर्यादा साऱ्या, जाणतेस तूच
अमर्याद सीमा  सगळ्या करशील पार तूच

रुढी-परंपरा सांभाळून आकाशालाही घालशील गवसणी
प्रवास घरसंसाराचाही सारा,  लावशील तू  सत्कारणी

स्पर्धा तुझी आता ,आहे फक्त तुझ्याशी
झुंज नव्या दमाने देणे , हेच लेणे तुजपाशी

उभ्या आडव्या रेषांनी आयुष्य सर्वांचे, सदा सजवलेस  तू
असेपर्यंत श्वास आता.. जगावेस  स्वाभिमानाने तू

©राहुल लाळे🌈
१८-०८-२०२१

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका