क्षितिज खुणावते

 क्षितिज खुणावते

राहुल





छेडिता तारा दुःखाच्या

गीतही आर्त उमटते

सुखाचे क्षण आठवता

हास्य मुखी विलसते


फूल  कोमेजून गळले 

तरी सुगंध मागे सोडते

सुवास तो श्वासात भरता

मन अजूनही मोहरते


स्मृतीतले चित्र जरी ते

हृदयचक्षूत जपायचे

अश्रू पुसून आता

आयुष्य नवे जगायचे



क्षितिजाच्या पलिकडे

वाट कुणी पहात आहे

आशेचे अंकुर मनात रुजवूनी

हासत भेटीस जायचं आहे


© राहुल लाळे 🌈

०३-०८-२०२१

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका