चाळीशी

 *चाळीशी*

राहुल


चाळीशी... समजू नका तिला सजा

सुरू झाली आता जगण्याची खरी मजा  !!


तारुण्यावर तेज चढले 

समजंसपणाचे

उत्साहालाही  भान आले

जबाबदारीचे


काय घ्यावे काय सोडावे

नजर थोडी बदलू लागली

नजरेतूनच भाव कळता

प्रेमाचीही रंगत वाढली


जगण्याचे नवीन मार्ग

डोळयांसमोर खुले झाले

प्रगतीच्या वाटेवर

चालणे जोमाने सुरु झाले


जगायचे फक्त आपल्यासांठी 

हे  आता कळायला लागते

आपल्यांची संख्याही

दिवसेंदिवस वाढायला लागते


कुणी म्हणा याला इंटरव्हल

कुणी म्हणा सुरवात जगण्याची

चाळीशी उलटो वा पन्नाशी

म्हातारपणाची ऐशीतैशी


तरुणपण टिकवून

प्रगल्भ व्हायचे

बालपण राखून ,

आयुष्य जगायचे


म्हणून म्हणतो मित्रांनो


चाळीशी... समजू नका तिला सजा

सुरू झाली आता जगण्याची खरी मजा  !!


©राहुल लाळे🌈

३०-०६-२०२१


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका