लाटा

 *लाटा...*





*लाटा...*


समुद्र तटावरती, उसळती या धुंद लाटा

फेसाळत जाताना.. बनवती त्या शुभ्र वाटा


लाटा जणू काही, कुरळ्या केसांच्या लडिवाळ बटा

प्रभाती -संध्याकाळी, मिरविती त्या सोनेरी  छटा


भरती  असो वा ओहोटी, यांचा आपला कायमच गजर

केव्हां  कधी उफाळून येती,अशी त्यांची आगळीच लहर


खळाळती भरारी लाटांची,  खडकांनाही भिववते

कपारीत त्यांच्या अनेकांच्या स्वप्नांना लपवते


पावलांवर येणाऱ्या लाटा, जणू सुख वाहून आणतात

शिंपल्याच्या मनी कशा,  मोती बनून राहतात


खुपते कधी  पायाखालची इथे वाळू, दिपवते डोळ्यांना परावर्ती  हे ऊन..

अन् आयुष्यही जणू ,उसळे इथे  लाटालाटातून


किनाऱ्यावरती येती  लाटा,  जीवाचंही होतं पाणी 

गाती वेडे अनेक ,लाटांची या जीवनगाणी....

लाटांची या जीवनगाणी


©राहुल लाळे

१४-१२-२०२०


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका