आत्महत्या

 *आत्महत्या*

राहुल



अस्वस्थ मनाला किती, करतात या आत्महत्या 

 उलथापालथ चालते ,केवढी मनात त्यांच्या ?

संताप जगाचा येतो,  का  येतो आप्तांचा...

का स्वत:च्याच अविरत वेड्या अविचारांचा?


कर्तव्य पार पाडताना ,जीवाचे रान करतो

चुकतात कधीतरी वाटा,  इकडेतिकडे भटकतो

 येतो राग  हजार प्रश्नांचा , वेदना अपेक्षाभंगाच्या

पण त्याग का करावा, आपल्या जीवाचा ?


मान्य होते स्थिती, कधी दोलायमान

 का घालवावं तरी ,आपलं आत्मभान?

आपल्यासाठी कोणी ,डोळे लावून बसलेत प्राण

 राहू द्यावं याचं सर्वांनीच थोडंसं भान


 होती जवळ हिंमत दांडगी, होतं एक खंबीर ही मन 

संकटात मन दुःखी, आज  संपवलं जीवन

इतकेही स्वस्त का हो,  व्हावे हे मरण ?

आईबापाच्या कष्टांचीही,  मग राहे ना आज जाण


असाव्यात अपेक्षा,ध्येयही असावे, 

जिगर असावी, असावे ही धैर्य 

आनंदात काम करावे,

अपयशातूनही उभे रहावे

 आत्महत्या हा नसे पर्याय


अनेक चिंता , काळज्या जरी अनेक  

जागृत असावी मती आणि शुध्द मन

लाख आली संकटे जरी, जाऊ नये खचून

मृत्यू  उपाय नाही, आहे अनमोल जीवन 


शरीर निघून जाते, स्वप्नं मरत नाहीत

 माणसं एकदा गेलेली, परत येत नाहीत...

असतील आसपास अभागी असे कोणी 

उमेद पुन्हा जागवू, आपण त्यांच्या मनी


अनमोल जीवन माणसाचे 

अखेरच्या श्वासापर्यंत जगायचे

संकटे, नैराश्याने खचून न जाता

आयुष्याला सामोरे जायचे


©राहुल लाळे

०१-१२-२०२०


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका