जागतिक महिला दिन
आज जागतिक महिला दिन, International Women's Day ...
राहुल लाळे
०८.०३.२०१९
Women's day च्या अनेक पोस्ट आल्या... मी ही पाठवल्या... काही मनाला भिडणाऱ्या, पटणाऱ्या, काही उगाच चेष्टा मस्करी करणाऱ्या पण तरीही स्त्रीचे कौतुक करणाऱ्याच.
पण आता वर्षभर काय ? आज आलेल्या एका जोकप्रमाणे कोणी म्हणेल..रोज आम्ही तिचेच ऐकतो....तिनं सांगितलं तसं वागतो, करतो...पण खरंच तशी परिस्थिती आहे? ऐकतो म्हणजे काय करतो? बाकीचं जाऊ द्या....आज कितीजण म्हणाले आपल्या आईला, बायकोला--- आज महिला दिन...काही करु नको... समजा आज म्हणलंही असेल, उद्याचं काय? घरातील बाई नोकरी करणारी असो, नसो तिला घरात मदत किती जणं करतात?
विचार करा...करत असाल तर चालू ठेऊया...नसेल तर चालू करुया
आज कंपनीत गेटवर बॅनर होता....लिहीलं होतं
Be a Girl with a Mind
A Woman with Attitude
And
A Lady with Class !!
शहरातील अनेक मुली, महिला वरील उक्तीप्रमाणे वागताना दिसतात, प्रयत्न करतात,.. पण खेड्यात काय?
परवा कोल्हापूरच्या पुढे चरण या गावी मित्रांसोबत एका मित्राच्या शेतात सहलीला गेलो होतो. अगदी सकाळी, आणि संध्याकाळीही शेतात फेरफटका मारला. तिथंही पाहिलं ...शेतातली, शेतासाठीची कामं बायका पुरुषांच्या बरोबरीने करत होती.... त्यांच्या परीने त्याही वरील उक्तीप्रमाणे attitude बाळगतात....शहरातील डेफिनेशन प्रमाणे नसेल पण त्यांनाही क्लास असतो....हा क्लास पोशाखी नक्कीच नाही... पण क्लास म्हणजे माझ्या मते पोस्ट, पोशाख नाहीच...तर *क्लास* म्हणजे ओरिजिनलिटी, आत्मविश्वास आणि कष्टाने स्वतंत्रपणे *मास* पेक्षा वेगळे दिसणं
पण अजूनही अशी परिस्थिती आहे की स्त्रिया कामानं , पदानं कितीही मोठ्या झाल्या तरीही त्यांना प्रत्येक गोष्टीत संघर्ष करायला लागतो, कमीपणा घ्यायला लागतो...पण कुठेही त्या प्रयत्नांत, जिद्दीत कमी पडत नाहीत...माझ्या एका परिचित सविता यादव यांची एक चारोळी आज वाचली
जिच्या विचारांना कायमच लागते कात्री....
तरीही खंबीरपणे जी कायम उभी रहाते ती स्त्री !!!!
स्त्रीचा संघर्ष, जिद्द, आकांक्षा यांना मर्यादा नाहीत... मनात आणलं तर त्या आकाशालाही गवसणी घालू शकतात.... हीच भावना व्यक्त करणारं हे गाईड मधलं गाणं
काँटों से खींच के ये
आँचल
तोड़ के बंधन बांधे पायल
कोई न रोको दिल की उड़ान
को
दिल वो चला ह ह हा हा हा
हा
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा है
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा
है...
अपने ही बस में नहीं मैं
दिल है कहीं, तो हूँ कहीं
मैं
अपने ही बस में नहीं मैं
दिल है कहीं, तो हूँ कहीं
मैं
जाने का पया के मेरी
ज़िंदगी ने
हँस कर कहा.हा हा हा हा
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा है
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा
है...
मैं हूँ गुबार या
तूफ़ां हूँ
कोई बताए मैं कहाँ हूँ
मैं हूँ गुबार या
तूफ़ां हूँ
कोई बताए मैं कहाँ हूँ
डर है सफ़र में कहीं खो न
जाऊँ मैं
रस्ता नया. हा हा हा हा
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा है
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा
है...
कल के अंधेरों से निकल
के
देखा है आँखें
मलते-मलते
कल के अंधेरों से निकल
के
देखा है आँखें
मलते-मलते
फूल ही फूल ज़िंदगी
बहार है
तय कर लिया. हा हा हा हा
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा है
आज फिर जीने की तमन्ना
है
आज फिर मरने का इरादा
है...

Comments
Post a Comment