मला कळायला हवं




 मला ठरवायला हवं...

जगाकडे कसं पहावं


मला कळायला हवं...

मी कसा वागावं


सौंदर्य पहाता काव्य स्फुरावे

अन्याय पहाता अंगार बरसावे


मंदिरी जाता मन प्रसन्न व्हावे

लाचार दुःखी पहाता अस्वस्थ व्हावे


मुखातून सदा स्तुतीसुमनेच उधळावी

नतद्रष्टांसाठी वाणीला धार लावावी


न्यायासाठी नित्य समर करावे

प्रगतीची कास धरून नंदनवन फुलवावे


स्वदुःख विसरुन इतरांच्या जखमांवर फुंकर मारावी 

आपल्याबरोबरच समाजाच्याही विकासाचीही आस धरावी


मला ठरवायला हवं..

मी कसं असावं


आपण बदलायचं...जगाला बदलायचं...

का बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं


राहुल लाळे...

०६.०३.२०१९

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका