ग्रेस

 आज अनेक ग्रुपवर ग्रेस काय 'दुर्बोध-कळत नाही असं' लिहितात, जे सर्वसामान्य लोकांना कळेल तेच श्रेष्ठ... अशा अनेक पोस्टस आल्यात त्यावर माझं मत....





भय इथले संपत नाही, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस कधीचा पडतो, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, पाऊस कधीचा पडतो ही गाणी लहानपणापासून ऐकत आलोय. तेव्हा गाण्याचे गीतकार , संगीतकार कोण ? असे प्रश्न पडले नाहीत. थोडं कळायला लागल्यावर लता, हृदयनाथ यांनी ही गाणी म्हटलीत हे समजल्यावर त्यांची गाणी ऐकायला लागलो. पुढे कविता, लेख, इतर गाणी ऐकताना ग्रेसची गाणी वेगळी गूढ वाचली.... आणि अभ्यास नाही तरी वाचन चालू केलं...


जे न देखे रवी ते ते देखे कवी असं म्हणतात...

कधी कधी कवितेत लिहिलेलं असतं,त्यापेक्षा अनेक वेगळे अर्थ नंतर निघतात...एखादी कविता करताना त्या कवीची मनस्थिती काय होती हे लक्षात घेतलं तर नंतर एखाद्या वेगळ्या मूडमध्ये  कधीतरी तो वेगळंच काही लिहिल आणि वाचणाऱ्याच्या मूडप्रमाणे आणि कल्पकतेने त्याचे अर्थही वेगवेगळे लागतील...किंवा एखाद्याला लागणारही नाही..


"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक पद्धत  आहे आणि मी आपल्याच प्रकारे  जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते. पण हे ही  स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे ग्रेसचं म्हणणं .


माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेसच्या 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' यात म्हटलंय


आणि तसंही शशी थरुरच्या इंग्रजीचं कौतुक करण्यापेक्षा ग्रेसच्या दुर्बोध मराठीचा अर्थ लावणं केव्हाही आवडेल..


बाकी कोणी काय वाचायचं आणि कोणाला काय आवडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न


राहुल

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका