फैज..*मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग*
*मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग*
फैज अहमद फैज
https://youtu.be/Lmg9m2Za61c?si=7Js9OM28AXzqh0Q_
मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग
मैं ने समझा था कि तू है तो दरख़्शाँ है हयात
तेरा ग़म है तो ग़म-ए-दहर का झगड़ा क्या है
तेरी सूरत से है आलम में बहारों को सबात
तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है
तू जो मिल जाये तो तक़दीर निगूँ हो जाये
यूँ न था मैं ने फ़क़त चाहा था यूँ हो जाये
और भी दुःख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग
अनगिनत सदियों के तारीक बहीमाना तलिस्म
रेशम-ओ-अतलस-ओ-कमख़्वाब में बुनवाये हुये
जा-ब-जा बिकते हुये कूचा-ओ-बाज़ार में जिस्म
ख़ाक में लिथड़े हुये ख़ून में नहलाये हुये
जिस्म निकले हुये अमराज़ के तन्नूरों से
पीप बहती हुई गलते हुये नासूरों से
लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी दुःख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग
फैज अहमद फैज यांची ही "मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग" गजल ऐकली...परत परत वाचली... पहिल्यांदा वाचल्यावर आईशपथ सांगतो कॉलेजचे स्वप्नाळू दिवस आठवले. जुने सिनेमे आठवले...जुनी अवीट विरहगीतं आठवली... आयुष्यभर एकत्र रहायच्या कधीही अलग न होण्याच्या आणा-शपथा घेतलेल्या प्रेमी युगुलांना वेगळं होऊनही यशस्वी, सुखी, समाधानी आयुष्याच्या एका टप्प्यावर कदाचित उतरणीला आल्यावर किंवा सर्व काही मिळाल्या नंतर जुन्या आठवणी उफाळून आल्यावर काय वाटत असेल.. असं काहीतरी पहिल्यांदा वाटलं. नंतर असंही वाटलं की कदाचित ज्यांच्या प्रेमाचा मुरुन मोरांबा झालाय, त्यांचंही हे कशावरून मनोगत नसेल? अती प्रेमाने किंवा अति सान्निध्यात राहून प्रेम विसरलेल्या किंवा अती प्रेमातून उद्भवलेल्या अपेक्षा, होणारे अपेक्षाभंग, न तुटावं, कधीही सुटू नये असं वाटणारं पण हातातून निसटत जातंय असं कधी. वाटणारं....असं काही वाटत असतानाच एक वेगळाच अर्थ कळायला लावणारी ही गज़ल
© राहुल लाळे
ज्या प्रेमीला त्याच्या प्रेयसी जवळ असताना जीवन लख्ख मोकळ्या प्रसन्न प्रेमानं उजळल्यासारखं वाटायचं, तिचे गम- दुःखापुढे जगाच्या दुःखाची पर्वा नसायची, तिच्या चेहऱ्यात त्याला जगाला विसरायला लावणारा सुकून, स्थैर्य मिळायचं...तिच्या जादूभरेली डोळ्यांशिवाय या जगात दुसरं काय अनमोल ठेवलंय असं वाटायचं... तो आता पहिल्यासारखी प्रीत मागू नको असं का म्हणंत असावा.. बाबूजींचं *आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको* आठवलं ना!!
एकेकाळी ती मिळाली असती तर सारं जग माझ्यापुढं फिकं, झुकलेलं असं वाटणारा, आता मिलनाच्या सुखाशिवाय आणखी बाकी बरंच आहे, प्रेमापेक्षा आणखी अनेक दुःखं आहेत असं का म्हणत असावा?
अनादी काळापासून अंधारलेली, भयानक एक गूढ जादूई रेशमी तलम वस्त्रालंकारात लपेटून आपल्याला मिळतीय .... धुरकट, धुळीनी, रक्तानं माखलेली शरीरं रस्त्यावर बाजारात विकली जातायतं. प्रियतमेचं सौंदर्य अजूनही तेवढंच अबाधित , मनभावन करणारं आहे पण तरीही दृष्टी नजर आता आजूबाजूच्या भळभळणाऱ्या वाहणाऱ्या जखमांकडे का वळतीये ?
मग साहजिकच *तेरी आंखोके सिवा दुनिया मे रख्खा क्या है* म्हणणारा *और भी गम है जमानेमें मोहोब्बत के सिवा* म्हणतो.
फैजसाहेबांची ही गज़ल खरंच सुरुवातीला एखाद्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकाचे प्रेमपत्र किंवा प्रेम वचन वाटू शकणारी कविता-शेर असे वाटते पण जस- जशी ती वाचत जातो तसतसा तिच्यातला भावार्थ सामोरा येतो आणि एखाद्याचे आत्मशोधन करण्याची भावना जागृत करणारी रचना आहे असे वाटतं. सर्वसाधारणपणे व्यक्त होणाऱ्या प्रेमाचा उल्लेख होता होता... ती एकदम समाजातील विदीर्ण व्यवस्थेवर जळजळीत व्यक्तव्य करते आणि अस्वस्थ करुन सोडते...आणि गजलेचा एक वेगळाच बाज पेश होतो
जाता जाता ...या गजलमधे चिराग मधलं मदनमोहननी संगीत दिलेलं रफी आणि लता या दोघांनीही गायलेलं *तेरी आखों के सिवा दुनिया मे रखा क्या है* या आपल्या आवडत्या गाण्याची ओळ सापडते... ती इथं कशी हा जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर ही कधीतरी युट्यूब वर मिळालं होतं...मजरुह सुलतानपुरींनी फैजची परवानगी घेऊन ती ओळ वापरून आपलं हे अजरामर गीत लिहिलं होतं.
©राहुल लाळे
*हीच गज़ल नूरजहाँच्या आवाजात कैदी सिनेमात ऐकायला मिळते....
https://youtu.be/DIt4nnOgTzg?si=-fQfCiflw7iMQbtv
Comments
Post a Comment