आपली आपली मस्तानी

 आपली मस्तानी....!

©राहुल लाळे

………………………………………







मनातली मस्तानी मिळणे एक स्वप्न असते 

ती कल्पना आपल्या मनात आणि जीवलगांत  बोललेली असते .

लग्नाची  आहे म्हणूनच बायको आपली असते

तिच्यासाठी आपण बाजीराव बनायचे अन 

आपल्यासाठी तिला मस्तानी बनवायचे असते 


लोक  म्हणतील हा खुळेपणा आहे ,

बोलणारे  लोक बोलत राहतात   

लपवणारे लपवत राहतात 

आपण कशाला काही लपवायचे ?

आपले आहे तेच मस्त आणि तीच मस्तानी 


बाजीरावाचे प्रेम ग्रेट असेल 

आमचेही काही कमी नाही 

आमच्या चारित्र्यावर  

शिंतोडे  उडवण्याची कोणाची हिम्मत नाही  

नैतिकतेचे डोस कुणाला हवेत ?

प्रेमाचे आशीर्वाद आहेत न मागे 


आपण किती बाजीराव आहोत आणि

आपली मस्तानी कशी आहे 

हे प्रत्येकाला  ठाऊक असते  

बायको  मस्तानी हवी असेल 

तर आपण बाजीराव व्हायचे असते    

मिळाली तिला फुलवायचे असते 

मानाने तिला मिरवायचे असते....


राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका