गुलाब
मन हवं गुलाबासारखं
काट्यासोबत कोमलता बाळगणारं
धसमुसळेपणाला ओरखडणारं..
रसिकांची चित्तवृत्ती बहरवणारं
विविध रंगात फुलणारं
सौंदर्याची बरसात करणारं
ललनेचं रुप खुलवणारं
गुणांना मान देणारं
पाकळ्यांनी रांगोळी सजवणारं
हाराची शोभा वाढवणारं
मधमाशीला मधु देणारं
कवीकल्पनेला साद घालणारं
प्रेमात साथ देणारं
स्व-अस्तित्व त्यागणारं
धुंद सुगंध देणारं
गुलकंदातून तोंड गोड करणारं
जीवनानंतरही शरीर पवित्र करणारं
रंगात रंगून जाणारं
*श्री* चरणी अर्पण होणारं
मन हवं गुलाबासारखं
सगुण सुंदर हसणारं....
© राहुल लाळे
१०.०७.२०१९

Comments
Post a Comment