प्राजक्त

 *प्राजक्त*



मिरवतो फक्त पाच पाकळ्या ;

छान सफेद किती कोवळ्या

देठ केशरी  इवलासा ,

देह  हलका फुलकासा ॥

 

आहे  हा नाजूक

नाही हा मादक;

ना कुणी याला माळतो    ,

स्पर्श कुणाचा याला ना भावतो 

हाती धरताच लगेच हा मळतो 


बागेत हा एका फुलतो

अंगण मात्र दुसरेच सजवतो

 

 किती करावे याचे वर्णन  ,

प्रेमाचे  हा करतो गायन 

फुलवण्यासाठी फुलून जातो

आसमंत सुगंधित करून जातो

 

प्रेम बहरता नयन आरक्त

मने मोहवतो हा प्राजक्त  ॥

 


राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका