आठवणी दिवाळीच्या….

आठवणी दिवाळीच्या….



 राहुल लाळे,

 

मित्रांनो

 

हे पूर्ण वर्ष कोविड १९ - करोना - लॉक डाऊन यात गेलं . आयुष्य अगदीच  काही  नीरस नाही  पण थोडं थांबल्यासारखं मात्र नक्की झालं होतं . आता हळूहळू गाडी रुळावर यायला लागली आहे .

गणपती झाले - नवरात्र -दसरा - कोजागिरी जाऊन आता नवा उत्साह घेऊन  दिवाळी येतेय…

 

गेले काही दिवस टिव्ही वर कॅडबरीमोती साबण अशा अनेक खास दिवाळी स्पेशल जाहिराती सुरु झाल्या आहेतत्या पाहून लहानपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या अनेक प्रसंगांची मालिका  डोळ्यासमोर उभी राहिलीप्रत्येक दिवाळी ही वेगळ्या मजेची असायची.

कधी आम्ही आजोळी मामाकडे जायचो किंवा कधी माझे - आते-मामे -मावस - चुलत भाऊ बहीण आमच्याकडे यायचे . आमची जागा छोटी - तर मामाकडे नाशिकला  हे मोठे घर , आत्या - काकाकडे खेडेगावात जागेचा प्रश्नच नाही . जागा छोटी असो वा मोठी … मजा मात्र तेवढीच असायची !

 

पहाटे -:३० ला उठून.पहिल्या आंघोळीचा (अभ्यंग स्नान  ) नंबर लागावा म्हणून आम्हा भावंडात स्पर्धा लागत असे - कोण पहिलं उठून अंघोळ करतंय आणि अंगणात सुतळी बॉम्ब लावून दिवाळीची सुरुवात कोण करणार याची  चढाओढ लागायचीदिवाळीच्या पहाटेचा माहोल सुगंधी उटण्याने अधिक मोहक होत असे . बोचणाऱ्या थंडीत चुलीवरगॅसवर / बंबात  तापणारे पाणी , पाट्यावर वाटलेला ओल्या खोबऱ्याचा रससुवासिक तेल , न्हाणी घरात लावलेला मिणमिणता दिवा ,धावती रांगोळी काढून त्यावर मांडलेला पाट , आईने / मामाने / आत्याने  किंवा काकू -मामीने अंगाला घसघसून लावलेलं उटणं  , निरांजनाची ओवाळ आरती . त्या अपार थंडीत हे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत गारठून न्हाणी घरात (मोरीतधावत जात अंगावर ओतलेला गरम -गरम पाण्याचा भरला तांब्याखास पहिल्या अंघोळीसाठी आणलेल्या महागड्या साबणाचा तो मलमली फेस आणि त्याच्या उंची सुवासात अंगभर पसरलेला तजेला अक्षरशः ओतू जात असे . आणि मग कधी एकदा फटाके वाजवायला अंगणात जातोय असं होई.

 सध्या केव्हाही नवे कपडे घेतले जातात - कारणं  बरीच असतात  - वाढदिवस -सणवार आहेतच - पण आज काय सेलउद्या काय कुठली स्कीम आणि कधी जस्ट चेंज म्हणून कपडे सहज आणले जातात.  पण त्यावेळी फक्त दिवाळी आणि कधीतरी वाढदिवसालाच नवीन कपडे असायचे आणि तेही त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीला परवडतील असे . आई वडील स्वतःची हौसप्रसंगी गरजही बाजूला ठेवून आम्हाला नवनवीन कपडे शिवायचेआज अंगावर ब्रान्डेड कपडे घालतांना जितका आनंद मनात दाटतो त्यापेक्षा  कैक पटीचं समाधान तेंव्हा त्या  कपड्यांत अनुभवता येईदारातल्या त्या मोजक्या चार पणत्यांचा लखलखाट आजच्या भरगच्च पणत्यांची/  लाईटिंगच्या माळांची रोषणाईला झाकून टाकणारा होता.  वडिलांनी शंभरदीडशे रुपयात दोन पिशव्या भरून आलेले फटाके वाटून घेतांना झालेली वादावादी आणि मग सामोपचाराने वाटणी होईमाझ्याकडे जास्ती फटाके आल्याचा आनंद दिवाळीनंतरही टिकून राहीहेच फटाके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरावे म्हणून अगदी लवंगी बारची माळ सोडवून त्यातला एक एक फटाका मोकळा करून वाजवायचाफुसक्या निघालेल्या फटाक्यांना (फुसका माल बन्सीलालउन्हात तापवून पुन्हा त्यांना वाजवी करणं अशा एक  ना अनेक युक्त्या काढत आम्ही फटाकेबाजी करत असू.

 

फराळाचं म्हणाल तर आईने घरात केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लख्ख घासलेले डबे स्वयंपाक घरातल्या फळीवर ओळीने मांडून ठेवलेले असतआई दिवसभर ऑफिसमध्ये राबूनही एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करीसणासुदीच्या दिवसात माझ्या मुलांना   लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देशआता बायको पण आईसारखीच राबून करते . पूर्वी चकली -लाडू - चिवडा - अनारसे म्हटले की फक्त दिवाळीतच , पण आता वर्षाचे बाराही महिने हे पदार्थ सगळीकडे उपलब्ध असतात ! पण विकतच्या फराळात घरगुती गोडवा नसतोचवीला असूनही त्या विकतच्या फराळात आईच्या किंवा बायकोच्या हातचा रुचकरपणा मात्र येत नाही.

 दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस- तो म्हणजे भाऊबीज त्याकाळात यावेळी गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होतीनेमक काय घ्यायचं हे आई ठरवीयांस कडून ..यांस भाऊबीज सप्रेम भेटअशी नावं घातलेली पाण्याची टाकीमांडणीपरात , ग्लासताटंडिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण आठवतात !!

 

काळानुसार काम-धाम -शिक्षण अशा अनेक कारणांनी सगळे नातेवाईक दूर गेले - - फेसबुक - व्हॉट्सअप च्या माध्यमातून जरी संपर्कात असलो तरी प्रत्यक्ष गाठी-भेटी एकाच शहरात असूनही दुरापास्त झाल्याप्रत्येक सणाला सगळे भेटतीलच असं  नाहीपण त्यांचा नुसता फोन आला तरी बरं वाटतंटेक्नॉलॉजी मुळे निदान ही सोय उपलब्ध झालीयेशेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असतंपण आठवणी कधीच  बदलणाऱ्या असतात.. नाही का ? 

 

ही दिवाळी तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्यसमृद्धी , भरभराट घेऊन येवो   II

 

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा !! 

 

 

II शुभ दिपावली !!

 

 राहुल लाळे 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका