पाडवा
उभारू या गुढी!
उभारु गुढी आज आरोग्याची
संयमाची अन् संकल्पाची
कर्तव्याची ही गुढी
तिला कडुनिंबाची फांदी,
माधुर्याची साखरमाळ,
आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ
सर्वसमावेशक गडूला
सद्विचारांचा शेला लावू
धैर्याने सारे संकट परतवू
जीवन पुन्हा अधिक समृद्ध बनवू
उभारु गुढी आज आरोग्याची
संयमाची अन् संकल्पाची
राहुल लाळे व परिवार
....!


Comments
Post a Comment