*महिन्याभराचा लॉकडाऊन आणि मी*
राहुल लाळे
लॉकडाऊन सुरु होऊन महिना उलटून गेला - शैक्षणिक ,आर्थिक, सामाजिक, औदयोगिक , व्यावसायिक सर्वच क्षेत्रात कसं सारं स्तब्ध झालंय असं वातावरण आहे .. शेअर बाजार कोलमडलाय -पुढं काय होणार ? आपलं - कुटुंबाचं -आपल्या व्यवसायाचं -कंपनीचं -देशाचं अशा अनेक शंका मनात अनेकांना येऊ लागल्या . त्यातून सोशल मीडियावर अनेक बातम्या ,पोस्ट्स,जोक्स , क्लिप्स -अफवा यायला लागल्या - त्याही आता जुन्या झाल्या
मार्चच्या २१ तारखेपर्यंत ऑफिस चालू होतं. आणि शासनाच्या निर्णयामुळे २२ तारखेपासून अचानक वर्क फ्रॉम होम सुरु झालं.. ३१ तारखेपर्यंत चालू रहाणारं लॉकडाऊन पुढे १४ एप्रिलपर्यंत आणि नंतर आता ३ मेपर्यंत वाढवलं गेलंय. पहिल्या आठवड्यात दोन वेळेला आणि नंतरही एरिया सील झाल्यावरही अगदी ऑफिसकडून मिळालेली कलेक्टरची परवानगी आणि पोलिसांकडून येणारा कोड घेऊनही दोन वेळा कंपनीत जाऊन आलो. सुरवातीच्या काही दिवसांनंतर WFH बरोबर ऑफिसच्या झूमवर अनेक मिटींग्ज,वेबिनार्स इत्यादी चालूच आहे - त्यामुळे कंपनीच्या कामाशी - सहकाऱ्यांशी कनेक्टेड आहे - पण फिझिकल काम नाही - जाण्यायेण्याचा प्रश्न नाही आणि अगदी काही अत्यावश्यक गोष्टी आणण्यासाठीच बाहेर जायचं त्यामुळे घरात असण्याचा प्रत्यक्ष वेळ खूपच वाढला.
मला वाटतं - सलग एवढे दिवस घरात बसून आहे अशी परिस्थिती शेवटची २८-२९ वर्षांपूर्वी इंजिनियरिंगला असताना सेमिस्टर एन्डच्या वेळींच - नंतर आठवतच नाही की इतके दिवस घरात बसून राहिलो.
गेले काही दिवस ऑफिसमध्ये खूप कामं होती - त्यामुळे पहिले एक दोन दिवस रविवारच्या सुट्टीप्रमाणे गेले.
नंतरचे एक दोन दिवस आठवड्याभरात ऑफिसमध्ये कसे जाणार हे प्लॅन करण्यात गेले आणि थोडी घरात आवराआवर करण्यात गेले .. सकाळची चक्कर आईबाबांकडे मारायची - दोन तीन वेळा चहा - दुपारची एक पडी - टीव्ही वर सिनेमे - पण दोन तीन दिवसानंतर जेंव्हा लक्षात आलं की आळस चढेल आणि कंटाळा यायला लागेल तेव्हा मात्र खडबडून जागा झालो . दुपारची झोप बंद केली
रजनीगंधा मधलं माझं आवडतं गाणं आहे - “कई बार यूं भी देखा है - ये जो मन की सीमारेखा है - मन तोडने लगता है - अंजानी आसके पीछे … मन दौडने लगता है “
सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी - रोज हेच व्हायला पाहिजे - असंच व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात - अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात - त्या अनेकदा आपण पाळतो - अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो -
आता या काळात घरात राहायची मर्यादा सांभाळून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि इतर काही मर्यादा ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले.
२५ मार्चला पाडवा होता -लवकर उठलो - आणि नव्या वर्षाची उत्साहात करायची असं नक्की करून गुढी उभारली. बायकोला स्वयंपाकात , घरकामात हातभार लावून पैकी पुरीवर ताव मारून ओटा आवरला. संध्याकाळ पावसाने चेहऱ्यावर थंड शिडकावा मारला आणि " एक पाडवा असा ही " कविता लिहून काढली
मग काय २६ तारखेपासून आजपर्यंत "आता काय करायचं ?" हा प्रश्न पडलाच नाही .
जवळपास एक टाइमटेबलच तयार झाले.
सकाळी सहाला उठायचं -चहा टाकायचा - सोसायटीच्या गेटवरील सिक्युरिटीला नेऊन द्यायचा ( जवळच्या - आपण घ्यायचा - जेवढे दिवस शक्य झाले तोपर्यंत जवळपास - नंतर टेरेसवर - घरातल्या घरात चालणं सुरु झालं. नंतर काही व्यायाम - घरातले सर्व जण एकत्र व्यायाम करायचा आनंद काही आगळाच. व्यायाम झाल्यावर पेपर वाचन - कधी कागदी तर कधी ऑनलाईन . मग रामायण .
कामवाल्या मावशींना सुट्टी दिल्यामुळे साफसफाईतली केर काढणे, वॊशरूम्स ची सफाई - फॅन्स-डस्टिंग पूर्वी करायचोच मात्र आता रोज . बागेला पाणी (इथं मात्र मला फारसा वाव नाही -सर्वस्वी तारिणी - ) आणि या महिन्यात तारिणीने सजवलेल्या टेरेसमध्ये आणि आमच्या जुन्या घरातल्या गच्चीत बाबांनी फुलवलेल्या बागेत वेगवेगळे गुलाब , कृष्णकमळ, मोगरा, कोरांटी, जास्वन्द, गोकर्ण, जुई , सायली, कढीपत्ता , टोमॅटो ,अळू , मिरच्या काय छान आलेत-येतायत. आपण घरात राहिलोय त्यामुळे आपला मूड आणि मनस्थिती उल्हसित करण्यासाठी जणू काही निसर्ग प्रयत्न करतोय का असं वाटावं !!!
तारिणी सोसायटीतल्या "स्वच्छ" कडून साफ सफाई करायला येणाऱ्या महिला कामगारांना रोज नाश्ता द्यायची - त्यांच्याबरोबर नाश्ता चहा व्हायचा - सुरवातीला नाश्ता बनवताना कांदा -टोमॅटो चिरून देणे, भाज्या निवडणे ,नारळ फोडून खरवडून देणे या कामांबरोबरच हळूहळू आता पोहे-उपमा -साबूदाणा खिचडी -सँडविच करायला शिकलो. डोसे - चटणी -आप्पे बनवता येतच होते - डोसा भाजी , भेळ करायला शिकलो. जेवायला कधी शॉर्टकट झाला तर मी व वरूण टेकओव्हर करायचो - भुर्जी -ऑम्लेट-सँडविच-हक्का नूडल्स माझी स्पेशालिटी. नाश्त्याबरोबरच दोन्ही जेवायच्याआधीची पूर्वतयारी - नंतरची भांडी घासणं हे काम माझ्याकडेच घेतलं. तीन चार वेळेला ऑफिसला जाऊन आल्यामुळे घराबाहेरची कामं - बँक -दूध-भाजी-किराणा आणण्याची कामं माझ्याकडेच ठेवली.
मध्ये एक दोन प्रॉब्लेम झाले - सोसायटीत पाणी बंद पडलं. - पंपाचा ऑटोकंट्रोलर बंद पडला - बाहेर माणूस मिळणं मुश्किल . मग काय इंजिनियरिंग शिक्षण आणि स्किल उपयोगात आणलं - कंट्रोलर सर्किट मॉडिफाय करून पंपाची इलेक्ट्रिकल वायरिंग बदलून मॅन्युअली चालू बंद करायची सोय केली. त्यामुळे महिनाभर पाणी चालू राहिलं . दोनतीन दुःखद बातम्या कळाल्या - त्यातली एक तर शॉकिंगच - पुण्यातला पहिला कोरोनाचा बळी १७-१८ वर्षे बरोबर काम करणारा सहकारी ठरला ही बातमी .
तो दिवस शॉक मध्ये गेला पण सावरून दुसऱ्या दिवसापासून परत जोमाने रुटीन चालू केलं. दररोज एक दोन वेबिनार्स, दुपारी ऑफिसच्या मिटींग्ज - नंतर रिव्ह्यूज -रिपोर्ट्स बनवणे - त्यावर परत मीटिंग्ज यात दुपार- संध्याकाळचा - कधी रात्रीचाही वेळ निघून जायचा. १५ एप्रिलला परत ऑफिस रुटीन चालू होणार त्यासाठीच्या तयारी यावर मीटिंग्ज - दिवस बिझीच होते . लॉक डाऊन वाढलं आणि हे नवीन रुटीनही.
टाईमटेबल मध्ये आता आणखी काही गोष्टी ऍड झाल्या - ऑफिसमधलं “5S” घरात आणलं - माझा वॊर्डरोब , फाईल्स, ड्रॉवर्स - घरातली लायब्ररी , माळे .यांची आवराआवर - नको असलेल्या वस्तू, पेपर्स डिस्पोज करून लागणाऱ्या गोष्टीची लिस्ट करून ठेवली . दररोज थोडं थोडं करत आठवड्याभरात हेही काम झालं
माळे आवरताना जुने फोटो ठेवलेली बॅग काढली - ते पाहता पाहता जुन्या आठवणी रंगवत वेळ कसा गेला कळलंच नाही. काही फोटो स्कॅन करून मित्रांमध्ये- नातेवाईकांमध्ये शेअर केले. रोज नवीन येणाऱ्या फुलांचे, संध्याकाळच्या आकाशाचे -सूर्यास्ताचे - सकाळी खिडकीत दिसणाऱ्या पक्षांचेही फोटो शेअर करण्यात मजा यायची - इतर मित्रांकडून येणारे फोटो बघण्यात वेळ छान जायचा. अनेक जण आपण घरात करत असलेल्या कामांचे - बनवलेल्या नवीन खाद्यपदार्थांचे फोटो टाकत होते - मलाही फोटो काढायची - आणि पोस्टायची फार आवड आहे - सुरवातीला मीही काम करतानाचे - बनवलेल्या पदार्थांचे फोटो पाठवले - नंतर वाटलं बायको - इतर बायका रोजच ही कामं करतात त्यांचे फोटो रोजच काढायचे म्हणलं तर फोनची मेमरी रोज भरेल आणि मी स्वतः काही कामं एरवीही मधून मधून करायचोच, मग ते फोटो पाठवायचे थांबवलं. खाद्यपदार्थांचे फोटो पाठवताना अस विचार कायम यायचा की - या खडतर परिस्थितीत अनेक लोकांना रोज खायची भ्रांत असेल - तर आपण हे काढून पाठवून काय साधणार आहोत - ही असंवेदनशीलता होणार नाही का असंही वाटून गेलं . पण स्वरूपवर्धिनीतली लहान मुलं - तरुण वर्धकही आपल्या कठीण स्थितीतही बनवलेल्या पदार्थांचे फोटो कौतुकानं टाकत होते - हे पाहून मी ही काही फोटो पोस्टलेच - मी केलेलया पदार्थांचे आणि बायकोनी केलेल्या पदार्थांचेही. या महिन्याभरात खायची प्यायची मात्र चंगळच झाली - बायकोनेही उत्साहाने नानाविध पदार्थ हौसेने बनवले - नेहमी बनणाऱ्या पदार्थांबरोबरच यु ट्यूबवर रेसिपी शोधून तिने रोज काय काय बनवलं याची एक लिस्टच तयार होईल - भात - पोळी सोडली तर एक पदार्थ आठ दिवसात परत रिपीट झाला नाही... आणि हे सर्व घरात असलेल्या वस्तूंमधूनच. तिला जसं वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतं तसं पदार्थांचे फोटो काढून पाठवणं मात्र अजिबात आवडत नाही पण मी मात्र तिचा विरोध ना मानत त्यांचे फोटो काढून तिचं आणि तिनं बनवलेल्या पदार्थांचं कौतूक करतच राहणार.
या कठीण परिस्थितीत प्रत्यक्ष बाहेर पडणं अवघड होतं - तरी आईबाबांची तब्बेत पाहायला- लागणाऱ्या गोष्टी द्यायला , आवश्यक सामान आणायला, अधूनमधून ऑफिसला जायला बाहेर पडत होतो पण कोविड १९ परिस्थतीत जसं डॉक्टर -मेडिकल स्टाफ -पोलीस - सामाजिक , सरकारी संस्था जसं प्रत्यक्ष काम करतात, तसं करण्याची संधी मिळाली नाही याची खंत होती. जनकल्याण रक्तपेढीत जाऊन रक्तदान करून ( आतापर्यंत एकूण ४५+ वेळा रक्तदान झालं ) वर्धिनीच्या २०० रक्तदात्यांमध्ये माझाही नंबर लावला. वर्धिनीच्या आणि PM CARES फंडात खारीचा वाटा उचलून प्रत्यक्ष काम करता न येण्याची खंत भरून काढायचा प्रयत्न केला. दान करताना डाव्या हातानं दिलेलं उजव्या हाताला कळून देऊ नये म्हणतात - माझं मत असं आहे - ज्याला दान करायचं त्याला अपमानित करू नये - शेवटी त्यालाही गरजेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा असतो -पण दान करण्याची क्षमता असणाऱ्यांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी कधी कधी ते जरूरीही आहे
घरी रहायचा एक फायदा झाला की - लिहिणं वाचन,गाणी ऐकणं -म्हणणं- शेअर करणं बऱ्यापैकी झालं. अनेक कविता लिहिल्या - काही आर्टिकल्स लिहिली - फेसबुकवर, व्हॉट्सअँपवर , माझ्या ब्लॉगवर पोस्ट केलं - इतरांच्या पोस्ट्स वाचल्या. मित्र- नातेवाईकांशी फोनवर गप्पा मारल्या
अनेक टीव्ही चॅनल्सवर - आणि ऑनलाईन जुने नवीन सिनेमे (त्यात मिथिला पालकर, अभय देओलच्या चॉपस्टिक्स - व टोगो हे फार आवडले ) आणि सुपर OPS, असुर , फॅमिली मॅन, दिल्ली क्राईम, रायकर फाईल्स वगैरे वेबसिरीज घेतल्या अजूनही काही पाहिल्या -काही नंतर पाहू म्हणून अर्धवट सोडल्या -
संध्याकाळी टेरेसवर हिंडताना सूर्यास्ताचे, संध्याछायेचे, चंद्र..शुक्राचे फोटो काढलेच पण चालता चालता थबकून काही काळ भान हरपून बघत रहाण्यात कसा वेळ गेला कधी कळालंच नाही.
रोज मी अनेक ग्रुपवर गाणी पाठवायचोच - आता जरा वाढलं. पाडवा ते रामनवमी - असे आठ दिवस रोज सात अशी गीतरामायणातली ( बाबूजींनी गायलेली तसंच आकाशवाणीवर सादर झालेली ओरिजिनल गाणी ) अनेक ग्रुपवर पाठवली. अनेकांना भावली - अनेक ओळखी झाल्या नवीन मित्र झाले . झूमवर ऑफिसच्या मिटिंग चालू होत्याच - आमचा मुंबई-पुण्याची मार्च एंडला होणारी मिटिंग कॅन्सल झाली म्हणून आम्ही मग झूमवर भेटलो . आमच्या COEP च्या allumni ग्रुपवर गाण्यांचा एक प्रोफेशनल तासाभराचा कार्यक्रम झूमवर केला जो शंभर जणांनी एन्जॉय केला. आणखी दोन तीन ग्रुपवर ऑनलाईन गाण्यांचे कार्यक्रम केले. पाडवा ते रामनवमी घरात सर्वांनी रामरक्षेची वाढत्या गणनेनी आवर्तनं केली, १२ एप्रिलला अथर्वशीर्षाची ११ आवर्तनं रोटरियन मित्रांसोबत Zoomवर झाली.
गाण्याबरोबरच वाचनही बरेच झाले - वसंतरावांवरचं संगीतसूर्य, , रात्ररंग , कृष्णकिनारा (परत) आणि अनेक पुस्तकं वाचून काढली,राकेश मारियाचं " लेट मी से इट नाऊ " -वाचतोय - अजूनही काही घरातल्या मिनी लायब्ररीतली पुस्तकं वाचायला घेतलीत कसा वेळ चाललाय काही कळतच नाही - एक दोन लेख - प्रवासवर्णनं लिहायचीत वेळच मिळत नाहीये ... पण लिहिणार .. नक्की लिहिणार ठरवून ठेवलंय ..
मध्येच पत्त्यांचे डाव झाले - गप्पा झाल्या - नातेवाईक- मित्रांशी फोनवर गप्पा झाल्या अनेक वर्षांनी घरात सर्वजण एकावेळी एकत्र राहिलो - जवळ आलो
बातम्या ऐकायचो .... उगाच नैराश्य नको म्हणून जरा कमीच ...
लॉकडाऊन उठेल - काम लवकरच सुरु होईल - आणि परत रोजच्या रुटीन चक्रात अडकून जाईन पण महिन्याभरात घालवलेला वेळ कधीच विसरणार नाही -
महिन्याभरात देशाचं आर्थिक, सामाजिक नुकसान नक्कीच झालंय - चक्र थांबलेच आहे - पण माझ्या गाडीचं मात्र ओव्हरहॉऊलींग झालं .
परवा सारांश पाहिला त्यातला एक संवाद फार भावला - आशा काही पूर्णपणे लोपलेली नाही –
आणि तसंही सर्वच काही लॉकडाऊन नाहीये..
सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे - घरातली -घरात बसून ऑफिसची कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन कोण करू शकतो? –
महिन्यापूर्वी पाडवा झाला - काल अक्षय्य तृतीया झाली…
लॉकडाऊन मात्र अक्षय्य राहणार नाही पण जीवन निश्चितच अक्षय्य राहील
"There is still a hope "
मरनेवालोंके लिये मरा नहीं जाता - उनकी यादे जरूर रहती है - जीवन चालू रहता है
दोन पावलं मागे आलोत - पण आता मोठा पल्ला गाठावा लागणार आहे - नक्कीच गाठू
अजून बरंच काही करायचंय - अनेक वाटा शोधायच्यात - लॉक डाऊन तात्पुरता आहे - तो ही महत्त्वाचाच –
कारण परिस्थिती नक्कीच बदलेल - नवीन आव्हानं सामोरी येतील - - पुढच्या वेगवान प्रवासासाठी…
रिता जरी दिन आता
मन भरलेले ठेवू
धीर धरून सदा
आशा जागती ठेवू
©राहुल लाळे
२७-०४-२०२०

Comments
Post a Comment