बेभान रात ही ...धुंद आसमंत हा

चांद तू अन् .. मी चांदणी तुझी
प्रीतीचा दीप तू....दीवाणी मी तुझी

आठवणी गोड त्या ..झोप ना क्षणभर
मोजल्या तारका मनी ..मी अशा रात्रभर

आकाश तेच जरी,  आज वाटे निराळे
प्रीतीचा धुंद गंध...  वेडावे मज रात्रभर

वाहिल्या प्रेमांजली ..चंद्रास मी मनोमनी
रात्रीनेही बेभान केले...  प्रेमात साथ देऊनी

संगतीची  सर तुझ्या ..  आज नसे कश्यात
देवास ही मी पहाते ...आता मी तुझ्यात

बेभान रात ही..धुंद आसमंत हा
बेभान रात ही..धुंद आसमंत हा

राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका