मिठी.... आलिंगन...किती छान शब्द आहे....आणि काय मनवतात तर म्हणे हग डे 😞
*मिठी ...*
राहुल लाळे
आयुष्यात सोबत
कायम तिचीच असावी
बाहूंच्या कवेत येण्या
तिची कधी ना नसावी ॥ १ ॥
नजरेत नजर खिळून राहावी
. जरी दुभंगे धरणी
विसरून जाव्या सर्व यातना
त्या मोहक क्षणी ॥२॥
आलिंगनात या रुसवे- फुगवे
सारे विरून जावे
गालावरच्या खळीत तिच्या
मी स्वतःला हरवून जावे ॥३॥
करकमलांची ही मिठी
राहो वा ना राहो
देह वेगळे झाले तरी
जीव एकमेकांत गुंतून राहो II४॥
©राहुल लाळे
१२-०२-२०१९
*मिठी ...*
राहुल लाळे
आयुष्यात सोबत
कायम तिचीच असावी
बाहूंच्या कवेत येण्या
तिची कधी ना नसावी ॥ १ ॥
नजरेत नजर खिळून राहावी
. जरी दुभंगे धरणी
विसरून जाव्या सर्व यातना
त्या मोहक क्षणी ॥२॥
आलिंगनात या रुसवे- फुगवे
सारे विरून जावे
गालावरच्या खळीत तिच्या
मी स्वतःला हरवून जावे ॥३॥
करकमलांची ही मिठी
राहो वा ना राहो
देह वेगळे झाले तरी
जीव एकमेकांत गुंतून राहो II४॥
©राहुल लाळे
१२-०२-२०१९

Comments
Post a Comment